लाखो भाविकांच्या उपस्थितीत कंकण मंगळसूत्र विधी : दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा
भरत कडोलकर / सौंदत्ती
‘उदो ग आई उदो’च्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या कंकण मंगळसूत्राचा विधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. बुधवार व गुऊवारी तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे नूतन कार्यनिर्वाहक अधिकारी बसवराज जिरग्याळ यांनी तऊण भारतशी बोलताना दिली. देवीचा पूर्णाहुती अभिषेक, होम, विशेष पूजा व आरती आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीच्या दर्शनाला सुऊवात झाली.
मार्गशीर्ष पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातून भाविकांची संख्या कमी झाली आहे. गुऊवारी विविध ठिकांणाहून भाविकांनी बस व खासगी वाहनांतून डोंगरावर हजेरी लावली. सुमारे दोन कि. मी परिसर भाविकांनी फुलून गेला होता. देवीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, कार्यनिर्वाहक अधिकारी बसवराज जिरग्याळ, एकनाथ जोगीनाथ मठाचे पिठाधिपती पीर योगी शिवनाथजी बाबा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा झाल्यानंतर उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मौनेश्वर मंदिरात कंकण मंगळसूत्र विसर्जन विधी पार पाडला. या मिरवणुकीत ढोल, ताशांच्या तालाने व अबीर भंडाऱ्याची उधळण करत डोंगर परिसर दणाणून सोडला.