Tarun Bharat

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 19 फेब्रुवारी रोजी

येळ्ळूर : 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवारी झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे होते. प्रारंभी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी स्वागत केले व बैठक बोलवण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी गत सालचा जमा-खर्च सर्वांसमोर मांडला व 19 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले.

यंदाचे साहित्य संमेलन कशा पद्धतीने पार पाडावे, याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नीटनेटके व व्यवस्थितरीत्या पार पाडले जावे, त्याचबरोबर गत दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साहित्य संमेलन थोडक्यात घेण्यात आले होते. पण यावर्षीचे साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात घेण्याचे ठरविण्यात आले.

पूर्वीप्रमाणेच सर्व नियोजित कार्यक्रम हाती घेण्यात येतील.  संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्याचबरोबर इतर पाहुणे यांच्याबाबत माहिती सांगितली. संमेलन नीटनेटकेपणाने पार पाडूया, असे सांगितले.

संमेलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची गाथा सांगणारा ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीला सदस्य परशराम बिजगरकर, ग्रा. पं. माजी सदस्य रमेश धामणेकर, परशराम धामणेकर, सुभाष मजूकर, कृष्णा टक्केकर आदी उपस्थित होते.

Related Stories

गुंजी परिसरात गवीरेडय़ाकडून भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

Patil_p

बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील हॉटेलमध्ये 45 हजाराची चोरी

Patil_p

विदर्भ-मराठवाड्यात निवडणूक घ्या. उर्वरित पावसाळ्यानंतर

Rahul Gadkar

मासगौंडहट्टी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Amit Kulkarni

बिबटय़ा नैसर्गिक अधिवासात गेला असावा?

Amit Kulkarni

विकासाचे गाजर मराठी भाषिकांच्या मुळावर

Amit Kulkarni