बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंगतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीव्दारे योगासनाची महत्व व योगाचे फायदे रॅलीव्दारे जागृती करण्यात आली. योग करा, निरोगी रहा, अशा घोषवाक्याने रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली गोवावेस येथील मनपा जलतरण तलाव व स्केटिंग रिंगपासून सुरूवात करण्यात आली. या रॅलीमध्ये 3 ते 20 वयोगटातील स्केटिंगपटूंनी या रॅलीत सहभाग घेतला होता. या रॅलीच्यामध्ये फलकाव्दारे नागरिकांमध्ये योगाचे महत्व व फायदे याची जागृती केली. यावेळी विवेक तिवारी, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, सक्षम जाधव, विशाल वेसणे, सागर चौगुले, विठ्ठल तसेच स्केटिंगपटू व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
Previous Articleआंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात
Next Article छ. शिवाजी क्लस्टरच्या क्रीडा स्पर्धा ऑगस्टमध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.