प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जितो लेडीज विंगतर्फे दि. 21 रोजी महावीर भवन येथे महिलांसाठी तालबद्ध योग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेऊन स्तोत्र, संगीत, देशभक्तीगीत यांच्या साथीने प्रात्यक्षिके सादर केली. अध्यक्षा रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कीर्ती दोड्डण्णावर यांनी आयोजनाचा हेतू कथन केला. स्पर्धेचे परीक्षक शिवानी उपाध्ये आणि वेदांती गोडबोले यांनी थोडक्मयात योगसाधनेचे महत्त्व विशद केले. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली. 41 ते 55 वयोगटातील प्रथम क्रमांक मुरलीधर योग गुरुकुल, द्वितीय आनंदी गुप, तृतीय सखी ग्रुप यांनी यश संपादन केले आहे. सूत्रसंचालन सपना पाटील यांनी केले. कार्यवाह रुमा यांनी आभार मानले.