Tarun Bharat

जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

‘मानवतेसाठी योग’ या घोषवाक्याला अनुसार जागतिक योग दिनानिमित्त आज सुवर्ण विधानसौध येथे जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा करण्यात आला.जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट आणि गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे योग दिवस साजरा करण्यात आला.

Advertisements

याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, आरसीयुचे कुलगुरू प्रा. रामचंद्र गौडा, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुलधाळी, शंकरगौडा पाटील यांच्यासह विविध सरकारी खात्यांचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, शलभासन यासह विविध योगासने केली. योगातज्ञ आरती संकेश्वरी यांनी या सर्वांना मार्गदर्शन करत योगासने करून घेतली.

Related Stories

कर्मचारी कामावर हजर न राहिल्यास वेतन कपात करणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

वटपौर्णिमेचे व्रत मोठय़ा भक्तिभावाने

Amit Kulkarni

बेंगळूरमधील शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी वसतिगृहे कंटेनमेंट झोन

Abhijeet Shinde

भाजी मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱयांची गैरसोय

Amit Kulkarni

अर्जुनवीर श्री साई सोशल, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स विजयी

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे सामाजिक संघटनांना धान्याचे वितरण

Omkar B
error: Content is protected !!