Tarun Bharat

अंतराळात योगसराव

Advertisements

महिला अंतराळवीराने केले गरुडासन

भारतातून सुरू होत जगभरात पोहोचलेला योगसराव आता प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. जागतिक योगदिनाला मान्यता मिळाल्यावर तर योगसरावाची किर्ती प्रचंडच वाढली आहे. आता तर अंतराळातही योगसराव केला जातोय. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात महिला अंतराळवीराने शून्य गुरुत्वाकर्षणात योगसराव कशाप्रकारे केला जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

युरोपीय अंतराळ संस्थेच्या अंतराळवीर समांथा क्रिस्टोफोरेटी यांनी अंतराळात काही योगमुद्रा केल्या आहेत. याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. समांथा यात शून्य गुरुत्वाकर्षणात काही योगमुद्रा करताना दिसून येतात. भारहीनता असूनही त्यांनी अनेक आसने विशेषकरून ‘गरुडासन’ किंवा ‘ईगल योग’ मुद्रेत स्वतःच्या योगप्रशिक्षकाच्या सूचना अंमलात आणल्या आहेत.

अंतराळवीर शून्य गुरुत्वाकर्षणात स्वतःच्या शरीराला संतुलित करत ईगल पोज करत असल्याचे दिसून येते. शून्य गुरुत्वाकर्षणात योग झाला आहे, हे काहीसे जोखिमीचे होते, परंतु योग्य मुद्रेसह आणि क्रिएटिव्ह स्वातंत्र्यासह तुम्ही हे करू शकता असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. योगसरावाला या अंतराळवीराने नव्या उंचीवर पोहोचल्याचे एका युजरने म्हटले आहे. समांथा यांच्या या ट्विटला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.

Related Stories

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

फुलांच्या राख्या आणि शहाळ्यांनी सजले दत्तमंदिर

Tousif Mujawar

100 विश्वविक्रम नोंदविणारा अवलिया

Patil_p

न्यायासाठी शंखनाद

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

समुद्रात तरंगणारे आलिशान घर

Patil_p
error: Content is protected !!