मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : विद्यार्थी-शिक्षकांसाठी रामदेवबाबानी घेतली प्रशिक्षण कार्यशाळा
पणजी : नवीन शिक्षण धोरण 2020 यामध्ये ‘फीट इंडिया मुव्हमेंट’ हा महत्वाचा भाग असून त्यासाठी योगासने महत्वाची भूमिका बजावणार आहे. फीट म्हणजे तंदुरुस्त राहण्यासाठी योग आणि योगासनांचा अभ्यास फार महत्वाचा आहे. शारीरिक आणि वैचारिकदृष्टया वाढ होण्यासाठी योग महत्वाचा असून येत्या शैक्षणिक वर्षापासून योगाभ्यास अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. पतंजली योगपीठ आणि गोवा शिक्षण संचालनालयातर्फे काल सोमवारी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषण केली.नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण लागू होणार आहे. फिटनेस हा योगाचाच एक भाग असल्याने त्याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. योग शिक्षण देण्यासाठी योगगुऊ रामदेव बाबा यांच्याशिवाय कोणीच योग्य व्यक्ती असू शकत नाही. म्हणूनच शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग अभ्यास शिकवून गोवा रोगमुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मिरामार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पतंजली योगपीठच्या सहकार्याने गोवा सरकारने गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यावर मोफत योग शिबिर पार पडले. यामध्ये हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. तीन दिवसांच्या या मोफत शिबिरात दिवसेंदिवस संख्या वाढत होती. यावऊन गोवा ही योगभूमी झाली याची खात्री होते.
मोफत योग अभ्यास शिकविणार
गोव्यात हजारहुन अधिक योग शिक्षक आहेत आणि पतंजली योग पीठातर्फे त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आपापल्या तालुक्यातील या शिक्षकांना संपर्क साधून त्यांना आपल्या विद्यालयात योगासने घेण्यास बोलवता येते. हे शिक्षक मोफत योग अभ्यास शिकविणार असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
गोव्यासह भारतात परिवर्तनाची गरज : रामदेवबाबा
मनोबल वाढविण्याकरिता तसेच निरोगी बनण्याकरिता योग महत्वपूर्ण आहे. शाळेत योगाला परिचित करणे गरजेचे आहे. योगाला आम्ही आमच्या जीवनात आत्मसात करणे तेवढेच महत्वाचे आहे. परिवर्तन येणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमातील भाषांमध्ये वेददर्शन, पूर्वजांचे धार्मिक मूलतत्वे शिकवून परिवर्तन आणणे गरजेचे आहे. भाषेबरोबरच सनातन बोध, संस्कृती शिकून भारतीयतेचा बोध प्राप्त करावा. शिक्षकांनी प्राचीन विद्येतून आध्यात्मिक बोध शिकविणे गरजेचे आहे असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले. गोव्यात योगाचे प्रशिक्षण दिलेले एक हजारहुन अधिक शिक्षक आहेत. पतंजली योगपीठातर्फे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी यावेळी दिली.
योगासने करणाऱ्या गटाला एक लाखाची बक्षिसी
बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सोमवारी शिक्षक आणि मुलांसाठी योगासने आणि योग अभ्यास प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. योगगुऊ रामदेवबाबा यांनी विविध आसनांचे फायदे याप्रसंगी उपस्थितांना सांगितले. तसेच काही योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. काही मुलांनीदेखील योगासनाची प्रात्यक्षिके दाखविली. प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या मुलांच्या समूहाला रामदेवबाबा यांनी 1 लाख ऊपये देण्याचे जाहीर केले.