Patanjali Medicines Ban : योगगुरु बाबा रामदेव (Yogguru Baba Ramdev)यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणानं दिले आहे.यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला (Patanjali Group) मोठा धक्का बसलाय. आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला पाच औषधांचं उत्पादन थांबवण्यास (Patanjali Medicines Ban) सांगितलंय.प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसंच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीनं करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी प्राधिकरणाकडं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीनं औषधांची तपासणी करण्यात आली. प्राधिकरणानं माहिती घेतल्यानांतर या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास दिले आहेत. या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे.
कोणत्या औषधांवर बंदी?
पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.


previous post
next post