उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांच्या कार्यकाळाला 6 वर्षे पूर्ण
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने राज्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. तसेच राजधानी लखनौमध्ये पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासह पॅबिनेट मंत्री मंचावर होते. याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळाचा अहवाल पत्रकारांसमोर मांडला. गेल्या सहा वर्षांत राज्याने देशात आणि जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ‘6 साल युपी खुशहाल’ नावाची पुस्तिकाही प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तिकेमध्ये भाजपने आपले सहा वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले आहे. गेली सहा वर्षे उत्तर प्रदेशसाठी खूप महत्त्वाची होती. आम्ही सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून त्याचे फलीत यापुढील कित्येक वर्षे मिळणार असल्याचे योगी म्हणाले.