वृत्तसंस्था/ गाझियाबाद (उ.प्र.)
येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बुधवारी भारताची योगिता खेडकर हिने महिलांच्या 87 किलो वजनगटात एकूण 183 किलो वजन उचलत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
योगिता खेडकरने 87 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 78 तर क्लिन आणि जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 183 किलो वजन उचलत कनि÷ गटात नवा राष्ट्रीय विक्रम केला. महाराष्ट्राची वेटलिफ्टर योगिता खेडकरने अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत राखल्याचे जाणवते. महिलांच्या 40 किलो वजनगटात महाराष्ट्राच्या आकांक्षा व्यवहारेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. आकांक्षाने स्नॅचमध्ये 60 किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये 71 किलो असे एकूण 131 किलो वजन उचलले. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती विद्याराणी देवी, हर्षदा गरुड, आकांक्षा व्यवहारे आणि सौम्या दळवी हे स्पर्धक या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने क्रीडा युवजन खात्याच्या सहकार्याने विविध तीन वयोगटामध्ये आयोजित केली असून विविध गटातील विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण 1.88 कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.