Tarun Bharat

महाआरतीला गैरहजर राहिलेल्या राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला ‘हा’ सल्ला

ऑनलाईन टीम / पुणे :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भोंग्याविरोधात भूमिका घेणारे मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे (vasant more) यांनी शनिवारी त्यांच्या भागात महाआरतीचे आयोजन केले होते. या आरतीला राज ठाकरे गैरहजर राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यांनंतर आज वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी “वसंत तु मिसळ महोत्सव घे, मी येतो,” असा सल्ला दिला.

सध्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. वसंत मोरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरे शनिवारी पुण्यात येणार असल्याचं मला माहीत नव्हतं. प्रसार माध्यमांमुळे ते मला समजलं. त्यावेळी मी त्यांना मेसेज करून महाआरतीबद्दल कळवलं. पण ते उपस्थित राहू शकले नव्हते. या महाआरतीनंतर आज राज ठाकरे यांची पुण्याच्या निवासस्थानी भेट घेतली.

त्यावेळी शनिवारी झालेल्या महाआरतीचं राज ठाकरेंनी माझं कौतुक केलं. तसेच मला महाआरतीला येता आलं नाही. पण “वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो,” असा सल्ला त्यांनी दिला. मी त्यांना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. ते निश्चित लवकरच येतील, असेही मोरे यावेळी म्हणाले.

Related Stories

पुण्यात उद्यापासून लॉक डाऊन नाही; पण निर्बंध कायम

Tousif Mujawar

गुवाहाटीहून परतलेले ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांना ईसीबीचा समन्स

Abhijeet Khandekar

”मुख्यमंत्र्यांची फसगत करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच महापालिकेच्या सत्ताधीशांची कानउघडणी केली पाहिजे”

Archana Banage

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील ‘हे’ नाव चर्चेत

datta jadhav

मिरजेत एकाच दिवशी कोरोना रुग्णांची सेंच्युरी

Archana Banage

मंत्री दीपक केसरकर यांच्या विकास निधीतून भटवाडी येथे हायमास लॅम्प

Anuja Kudatarkar