प्रतिनिधी /बेळगाव
तिगडी, ता. बैलहोंगल क्रॉसजवळ गांजा विकणाऱया एका तरुणाला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी बैलहोंगल पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
तिगडी क्रॉसजवळ गांजाविक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी छापा टाकून संतोष गंगय्या शिंदोळीमठ, रा. मर्डीनागलापूर या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 255 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या तरुणाने आपल्या घराच्या परसात पिकविलेल्या चार फूट उंचीचे एक गांजाचे झाड पोलिसांनी जप्त केले. त्याचे वजन 250 ग्रॅम इतके होते. संतोषला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.