Tarun Bharat

Exclusive News : कोल्हापुरात भर चौकात दम मारो दम, तर तावडे हॉटेल परिसरात आतषबाजी

Kolhapur News : कोल्हापुरात भर चौकात एक तरूण हुक्का मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धैर्यप्रसाद चौकात ही घटना घडली आहे. केवळ एकाच दिवशी हा प्रकार घडला नसून भर चौकात प्रत्येक 15 दिवसाला असाच प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात प्रथम तरूण भारतने या वृत्ताची माहिती समोर आणली आहे.असे प्रकार घडत असताना गांधीनगर आणि कोल्हापूर पोलीस काय करत आहेत,असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

एवढेच नाही तर भर रस्त्यात तावडे हॉटेल परिसरात युवकांनी कारवर आतषबाजी केल्याचा व्हिडिओ देखील तरूण भारत प्रतिनिधाच्या हाती लागला आहे. भर चौकात दम मारो दम करणारा युवक हा बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर काही चौकात मध्यरात्री आतषबाजी करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पोलीसांनी तातडीने या प्रकारात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Stories

आता सरकार विकणार १०० टक्के शुद्ध सोनं

Archana Banage

Friendship Day: शिवसेना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं- शहाजी पाटील

Abhijeet Khandekar

शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर

Archana Banage

कोल्हापूर : अमित राठोड खून प्रकरणी दोघा संशयिताना अटक

Archana Banage

ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

Archana Banage

क्षत्रिय जगद्गुरू पिठाचे कार्य कौतुकास्पद:- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

Archana Banage