पेडणे पोलिसांची कारवाई; हरियाणा येथून घेतले ताब्यात
प्रतिनिधी /पेडणे
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अनिल रावत 21 वषीय (मूळ मध्यप्रदेश) या युवकाला पेडणे पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल रावत 21 वषीय युवक मध्यप्रदेश येथील रहिवासी असून सध्या राष्ट्रीय महामार्ग 66 या रस्त्याच्या काम करणारे एम व्ही आर कंपनीच्यास कंत्राटदाराच्या कामगार सोबत राहतो. त्याचठिकाणी काम करणारे व्यंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मोहम्मद इसाक (40 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित युवकाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलगी आणि संशयित हा एम. व्ही. आर कंपनीत कामाला होता.
पेडणे पोलिसांना माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी अपहरण करणाऱया अनिल रावत याला हरियाणा येथून हरियाणा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. गोवा चिल्ड्रन कायद्यानुसार कलमाखाली गुन्हा नोंदवून, त्याला अटक करण्यात आली. ही कार्यवाही पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नवीन देसाई, महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सागर खोरजुवेकर आणि इतर पोलीस हरियाणा येथे जाऊन हरियाणा पोलिसांच्या सहकार्याके अनिल रावत या 21 वषीय युवकाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली.
राष्ट्रीय महामार्ग 66 यासाठी काम करणाऱया मजुरांची पूर्णपणे माहिती कंत्राटदाराने ठेवणे आवश्यक आहे. आणि त्या संबंधित पोलिसांकडेही नोंदणी करणे आवश्यक आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. हल्ली गुन्हे वाढत असल्याने तालुक्मयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे मत नागरिक व्यक्त करताना दिसतात.