Tarun Bharat

तरुणाईला लागले थर्टीफर्स्टचे वेध

ओल्ड मॅन-पार्ट्यांच्या नियोजनाला वेग : अनैतिक घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज

प्रतिनिधी /बेळगाव

31 डिसेंबर अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने तरुणाईला थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत थर्टीफर्स्ट शासनाच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागला. मात्र यंदा थर्टीफर्स्ट उत्साहात साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. शहरातील विविध भागात ओल्डमॅनच्या तयारीत युवक मग्न झाल्याचे दिसत आहे.

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र, शासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतली जाते. अलीकडे ग्रामीण भागातील शिवारात पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पिकांची नासधूस केली जात आहे. काही मद्यधुंद तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना संकटानंतर यंदा यात्रा-जत्रा आणि सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरही उत्साहात साजरा करण्यासाठी तरुणाईची तयारी सुरू आहे. याचबरोबर शहरातील हॉटेल व्यावसायिक थर्टीफर्स्टसाठी सज्ज झाले आहेत. विशेषत: शहराजवळील परिसरात पोलिसांची नजर असणार आहे. त्यामुळे पार्ट्यांसाठी युवकांना जागा शोधावी लागणार आहे.

नुकताच मार्गशीर्ष महिना संपला आहे. त्यामुळे महिलांसाठी मांसाहाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या निमित्ताने घरगुती पार्ट्यांना रंग येणार आहे. त्यामुळे चिकन, मटणाची खरेदी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेषत: सोशल मीडियावर सर्वत्र नववर्ष स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. या दिवशी काही युवकांकडून मद्यप्राशन करणे आणि स्टंटबाजी, हुल्लडबाजी करणे शिवाय वाहने जोरात चालविणे असे प्रकार पाहायला मिळतात. मात्र, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे.

Related Stories

टिप्परची दोन दुचाकींना धडक

Patil_p

शमनेवाडी, बेडकिहाळमध्ये 1410 ग्रॅम गांजा जप्त

Patil_p

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू

Patil_p

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅलेट मशीन रवाना

Amit Kulkarni

लम्पिस्कीनमुळे जनावरांचा बाजार बंद

Amit Kulkarni

रेल्वेचे काहीअंशी खासगीकरण ग्राहकांच्या फायद्याचेच

Patil_p
error: Content is protected !!