Tarun Bharat

करियर निवडताय ? मग हे नक्की वाचा…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

परवाच दहावीचा निकाल लागला. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडते ते ऍडमिशन कुठे आणि कशात घ्यायचे. करियर मधील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांना गोंधळात पाडणारा असतो.पण 10 वी नंतर योग्य करिअर निवडणे खूप महत्त्वाचे आणि अवघड असते. प्रशिक्षित करिअर सल्लागारासह करिअर समुपदेशन घेऊन आपण आपले विषयाची निवड करण्याबाबतचे गोंधळ दूर करू शकतो. आज दहावीसाठी करिअर मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.

मित्रांना फॉलो करणे सोडा
अनेक विद्यार्थी करियर ची दिशा निवडताना मित्रांनी निवडलेला पर्याय निवडतात ही चूक कधी करू नये. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय ठरू शकतो. आपला मित्र कोणता पर्याय निवडत आहे हे करण्याऐवजी आपली आवड कशात आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पालकांचा अट्टाहास
काही पालक त्यांच्या आवडीचा विचार करून मुळांच्यावर दबाव घालतात. पण हे साफ चुकीचे आहे. पण, पालकांच्या किंवा सामाजिक दबाबाखाली येऊन करियर निवडू नका आपली आवड त्यांना पटवून द्या.

योग्य सल्ला
पूर्वी ज्ञानाच्या अभावामुळे 10 वी नंतरचे पर्याय निवडण्यात चुका होतं असायचा पण आता पुर्ण बदललं आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान यासोबतच आता स्वतंत्र श्रेणी सुद्धा तुम्ही निवडू शकता. संपुर्ण माहिती घेवूनच दिशा निवडणे योग्य राहील.

कला विषयाचे फायदे-

पत्रकारिता, भाषा, इतिहास, मानसशास्त्र इत्यादीसारखे अनेक मजबूत करिअर पर्याय उपलब्ध आहेत.

आर्ट्स मध्ये मानसशास्त्र विषय ठेवल्यावर मानसिक आजार असलेल्या रुग्णांचे तुम्ही कौन्सिलिंग करू शकता.

कला विषय सर्जनशीलता आणि आत्म-अभिव्यक्तीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे तुमचा UPSC , MPSC इतर सरकारी नोकऱ्यांचा मार्ग सुलभ होतो.

BSW, MSW यासारखे सामाजिक सेवेचे कोर्स देखील तुम्हाला पुढे करता येतात.

वाणिज्य शाखा निवडीचे फायदे

वाणिज्य विषय हा एक असा प्रवाह आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यापार आणि व्यवसायाचा अभ्यास करावा लागतो, तर व्यावसायिक संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व प्रक्रिया आणि क्रियाकलापांचा अभ्यास करावा लागतो.
या क्षेत्रात करियर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी वाणिज्य शाखेची निवड करतात ते फायनान्स प्लॅनिंग, अकाउंटन्सी, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, ब्रोकिंग, बँकिंग इत्यादी यापैकी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.

विज्ञान शाखेचे फायदे

तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांची निवड करू शकता.

तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात आवड असेल , तर तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र (PCMB) या विषयांची निवड करू शकता.

असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना गणित आवडत नाही म्हणून काळजी करू नका, जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे असेल तर गणित विषय घेणे आवश्यक नाही.

तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी सहज निवडू शकता, म्हणजे तुम्ही PCB चा पर्याय देखील निवडू शकता.

D pharmacy, B pharmacy M pharmacy हा सुद्धा तुमच्याकडे पर्याय आहे.

याशिवाय तुमची आवड स्वतंत्र असेल तर तुम्ही फॅशन डाझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, ITI यासारखे देखील कोर्स करू शकता.

Related Stories

सांगलीच्या अभियंत्यांची `इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर’ निर्मिती

Archana Banage

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कोणते आहेत फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

‘सीटीईटी’ परीक्षा ये त्या डिसेंबरमध्ये

Rohit Salunke

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर

Abhijeet Khandekar

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी झाला जागतिक आघाडीच्या ‘कॉग्निझंट’ कंपनीचा प्रमुख

Archana Banage

‘अपग्रेड’कडून लवकरच 1 हजार जणांची भरती

Amit Kulkarni