Tarun Bharat

मोटर सायकल चोरी प्रकरणी तरुणास १ वर्ष कारावास

शिरोळ/प्रतिनिधी 

शिरोळ आणि नृसिंहवाडी परिसरातून चार मोटर सायकलची चोरी केल्याप्रकरणी आरोपी विजय सतीश कांबळे (वय २५, लोकुर ता. अथनी जिल्हा. बेळगाव) यास जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १ वर्षे कारावासाची, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.तर या प्रकरणाचा शिरोळ पोलिसांनी तपास केला होता.

याबाबतची सविस्तर माहिती अशी  की, विजय सतिश कांबळे याने सन २०२० साली नृसिंहवाडी व शिरोळ येथून चार मोटारसायकलची चोरी केली होती. त्याबाबतची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वहिदा ईलाई पिंजारी यांची स्कुटी त्यांच्या दुकानासमोरुन दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी चोरी झाली होती. तसेच, शिवराज दिपक जाधव यांची मोटार सायकल दि. १६ डिसेंबर २०२० रोजी शिरोळ येथुन चोरी झाली होती. तसेच, दत्तात्रय अनिल डकरे यांची हिरोहोंडा मोटार सायकल नरसिंहवाडी येथुन दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी चोरी झाली होती, तसेच, संजय अमगोंडा पाटील यांची ज्युपिटर गाडी दि. २८ डिसेंबर २०२० रोजी हॉटेल कॉर्नर येथुन चोरी झाली होती. मोटर सायकलच्या चोरीच्या प्रकरणाचा तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार डी.डी. आर. एस. पाटील, एस. बी. नाईक यांनी तपास केला होता.

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी विजय सतीश कांबळे यास अटक करुन त्याचेकडून वरील चार मोटारसायकल जप्त केल्या होत्या. सदर केसमध्ये फिर्यादीच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या. विशेष सरकारी वकील  सुर्यकांत मिरजे यांनी आरोपीच्या ताब्यातुन चोरीच्या मोटारसायकल जप्त झाल्याने त्याने गुन्हा केल्याचे सिध्द होते हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरला व आरोपीविरुध्द असलेल्या चारही केसमध्ये प्रत्येकी ३ महिने कैद अशी एकूण एक वर्षाची शिक्षा सुनावली.

Related Stories

फुलांच्या वर्षावात विद्यार्थी शाळेत दाखल

Patil_p

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत ६.९६ टक्के मतदान

Archana Banage

बस्तवाडातील मराठी शाळेची तोडफोड

Amit Kulkarni

बहुगुणी कंदमुळांचा लाभ घेण्याची आवश्यकता

Amit Kulkarni

बाराव्या दिवशीही बस बंद, प्रवाशांना घ्यावा लागतोय रेल्वेचा आधार

Amit Kulkarni

कोल्हापूर : कृष्णा आणि पंचगंगा पाणी पातळीत गेल्या बारा तासात एक फुटाने वाढ

Archana Banage