Tarun Bharat

उसगांव येथे टेम्पोच्या धडकेत युवक ठार

Advertisements

प्रतिनिधी /फोंडा

तिस्क-उसगांव येथे एमआरएफ कंपनीजवळ झालेल्या टेम्पोच्या धडकेत दुचाकीचालक युवक जागीच ठार झाला. मोहम्मद उर्फ मुन्ना नदाफ (20,मूळ सांगली, रा. कसयले तिस्क उसगांव) असे त्याचे नाव आहे. सदर घटना शनिवारी उशिरा रात्री घडली.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआरएफ प्लांट-2 समोरील  तिस्क उसगांव-धारबांदोडा महामार्गावर जोडणीच्या नाक्यावर हा अपघात घडला. मयत मोहम्मद आपली एव्हियेटर जीए 05 एन 3718 ने उसगांवहून फोंडय़ाच्या दिशेने येत होता. यावेळी फोंडय़ाहून धारबांदोडामार्गे जाणाऱया दुधवाहू टेम्पो जीए 04 टी 5641 ची निसटती धडक दुचाकीला बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला पिळये धारबांदोडा येथील इस्पितळात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी टेम्पोचालक उल्हास यशवंत गावकर (42, सोनाळ, सत्तरी) याला फोंडा पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन हाकून युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. हवालदार देवीदास पर्येकर अधिक तपास करीत आहे.

Related Stories

आयआयटी विरोधकास अटक, तिघांना वॉरंट

Amit Kulkarni

मयेवरील अविकसित आणि मागास हा ठपका पुसून काढणार प्रेमेंद्र शेट

Amit Kulkarni

निरिक्षक सागर एकोस्कर यांना निलंबित करावे

Patil_p

सासष्टीत 33 पंचायतीतून 863 उमेदवार

Amit Kulkarni

पक्षाशी एकसंध राहणार

Amit Kulkarni

फोंडय़ात गोवा फॉरवर्डचा धुरा व्यंकटेश नाईकांच्या खांद्यावर

Omkar B
error: Content is protected !!