Youth of Kudopi Tembwadi drowned in river bed
मालवण तालुक्यातील कुडोपी टेंबवाडी येथील रितेश सुभाष पेडणेकर (वय ३०) या युवकाचा सोमवारी पारवाडी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश हा सोमवारी सकाळी कुडोपी खालचीवाडी येथील पारवाडी नदीपात्रात मासेमारीकरिता गेला होता. याचदरम्यान त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी रितेश याचे वडील सुभाष पेडणेकर यांनी पोलिसांना खबर दिली. रितेश याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत बुडून मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त केला. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, हवालदार अभिताज भाबल यांनी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास एस. व्ही. पुरळकर करीत आहेत.
आचरा / प्रतिनिधी