बेळगाव : शिवसंवाद यात्रेवेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची बेळगावमधील युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी भेट घेतली. सावंतवाडी येथून आजऱयाला जात असताना आंबोली येथील सरकारी विश्रामगृहावर युवा सैनिकांनी आदित्य यांची भेट घेऊन त्यांना बेळगाव भेटीची विनंती केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी आंबोली परिसर दणाणून निघाला. यावेळी युवा सेनेचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, सोमनाथ सावंत, अद्वैत चव्हाण-पाटील, मयांक पावशे, विदेश बडसकर, अभिषेक वाईंगडे यासह बेळगाव युवा सैनिक उपस्थित होते.