Tarun Bharat

पुलाची शिरोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पुलाची शिरोली/ वार्ताहर

पुलाची शिरोलीतील देसाई मोहल्ल्यात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. रमजान अकबर देसाई वय वर्षे २५, रा. देसाई मोहल्ला, बँक ऑफ इंडियाच्या मागे, पुलाची शिरोली असे त्याचे नाव आहे.

बुधवारी मध्यरात्री दीड ते सकाळी दहाच्या दरम्यान रमजानने राहत्या खोलीतील स्लॅबच्या हुक्कास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद सलिम बाबुलाल देसाई यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तो सैन्य भरतीमध्ये बरीच वर्षे प्रयत्न करत होता. त्याला यश मिळाले नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची चर्चा ग्रामस्थांच्यात सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मिरका तपास करत आहेत.

Related Stories

ऊसतोड कामगारांची गावाकडे जाण्यासाठी घालमेल

Archana Banage

चौका चौकात झळकले पोस्टर बॉईज; इच्छुकांच्या डिजिटल फलकांनी शहर व्यापले

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनला 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

Archana Banage

एसटी आंदोलन चिरडण्याचे काम – धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 पासून

Archana Banage

कोल्हापूर : बार उघडले…, मंदिरं कधी ?

Archana Banage