रत्नागिरी/प्रतिनिधी
शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असताना आज रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथेही त्याचे पडसाद उमटले. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज मालगुंड येथे आले असताना त्यांना युवासेनेने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.
उद्योगमंत्री उदय सामंत हे गणेश दर्शनासाठी मालगुंड परिसरात आले होते. ही बातमी युवासेनेला कळताच युवासैनिक एकत्र आले.युवासेना विभाग अधिकारी रोहित साळवी यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काळे झेंडे दाखवून युवासैनिकांनी निषेध केला.यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी काळे झेंडे दाखवू नका असे सांगितले. त्यावर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचे स्पष्ट केल्याचे रोहित साळवी यांनी सांगितले.