Tarun Bharat

युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Advertisements

प्रतिनिधी/सिंधुदुर्ग

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. राजकारणात भाजपच्या माध्यमातून दमदार एंट्री केल्यानंतर प्रथमच लखमराजे भोसले यांचा वाढदिवस सावंतवाडीत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त लखमराजे भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकानी शुभेच्छांचा वर्षाव केला. लखमराजे यांची पुढील कारकीर्द यशस्वी होवो. त्याचबरोबर लखमराजे भोसले यांच्याकडून जनसेवा घडत राहो अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी लखमराजे भोसले म्हणाले, आपल्या माध्यमातून यापुढे जनसेवा करत राहीन, विकासाबाबत लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. तसेच जनतेने राज घराण्यावर प्रेम केले तसेच प्रेम माझ्यावर कायम राहाे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखनराजे यांचे वडील खेमसावंत भोसले, आई सुभदादेवी भोसले, श्रद्धाराजे भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, जिल्हा प्रवक्ते संजू परब, मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav

लक्ष्मण जगतापांना एवढ्या लांब आणणे अयोग्य; जयंत पाटील

Abhijeet Khandekar

CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्याने, आता अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार केंद्रीय पद्धतीने

Abhijeet Shinde

‘आत्मनिर्भर’च्या वाटेवरील चटके!

NIKHIL_N

sangli-नागपंचमीला परवानगी द्या, खासदार धैर्यशील मानेंची लोकसभेत मागणी

Rahul Gadkar

ममता बॅनर्जी-शरद पवार भेटीवर संजय राऊत म्हणतात…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!