Tarun Bharat

राष्ट्रकुलमध्ये चार पदके मिळण्याचा झरीनला विश्वास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

28 जुलैपासून सुरू होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धे किमान 4 सुवर्णपदके मिळवतील, असा विश्वास अलीकडेच नव्याने विश्वविजेतेपद मिळविणाऱया निखत झरीनने व्यक्त केला आहे.

मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात अलीकडच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय मुष्टियोद्धय़ांच्या कामगिरीत सातत्य दिसून येत आहे. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे मुष्टियुद्ध पथक किमान 4 सुवर्णपदके मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धय़ांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताची सहावेळा विश्वविजेतेपद मिळविणारी महिला मुष्टियोद्धी मेरी कॉमला चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले होते. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धय़ांनी 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली होती.

तेलंगणाची महिला मुष्टियोद्धी तसेच नव्याने विश्व चॅम्पियन म्हणून ओळखली जाणारी निखत झरीनचे राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचा 12 जणांचा मुष्टियुद्ध संघ सहभागी होत आहे. या संघाकडून भारताला किमान 8 पदके मिळतील, अशी आशा झरीनने व्यक्त केली आहे. गेल्या मे महिन्यात तुर्किये येथे झालेल्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत 52 किलो फ्लायवेट गटात 26 वषीय निखत झरीनने विश्वविजेतेपद मिळविले होते. या आगामी स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निखत झरीन बोलत होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा भारतीय मुष्टियोद्धय़ांना आता चांगलाच अनुभव मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय प्रति÷sच्या स्पर्धांमध्ये यापुढे मी नेहमीच पदकांसाठी भुकेलेली राहीन, असेही झरीनने म्हटले आहे. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होताना ड्रॉ महत्त्वाचा असतो. कठीण ड्रॉ असल्यास स्पर्धकाला बऱयाच वेळेला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागते. त्यामुळे कोणता खेळाडू पदक मिळविणार, हे सध्या वर्तविता येत नाही, असेही ती म्हणाली.

बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारासाठी 12 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पुरुष विभागात ऑलिम्पियन मुष्टियोद्धे अमित पांघल (51 किलो), शिवा थापा (63.5 किलो), मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलो), रोहित टोकास (67 किलो), सुमित कुंडू (75 किलो), आशिष चौधरी (80 किलो), संजीत (92 किलो) आणि सागर (92 किलोवरील) भारताचे प्रतिनिधित्व करतील. महिलांच्या विभागात निखत झरीन (52 किलो), ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन (70 किलो), 2021 च्या आशियाई युवा स्पर्धेतील कास्यपदक विजेती जस्मीन (60 किलो) आणि दोन वेळची युवा माजी विश्व चॅम्पियन नितूचा या संघात समावेश आहे.

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्पर्धकांना प्रामुख्याने इंग्लंड, आयर्लंड यांचे आव्हान राहील. या स्पर्धेच्या पूर्वतयारीकरता निखत झरीन आयर्लंडमध्ये दोन आठवडे अगोदरच दाखल होत आहे. आयर्लंडमध्ये दोन आठवडय़ांसाठी ती सराव शिबिरात दाखल होणार आहे. नुकत्याच झालेल्या स्ट्रेंजा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत निखत झरीनने दोन सुवर्णपदके मिळविली होती.

Related Stories

दीप्ती शर्माची टी-20 मानांकनात दुसऱया स्थानी झेप

Patil_p

प्रणॉय, अश्विनी-सिक्की रेड्डी उपउपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक वाया

Patil_p

संगवान, नीरज स्वामी पहिल्या फेरीत विजयी

Patil_p

भारत-बांगलादेश दुसरी कसाटी आजपासून

Patil_p

माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ! BCCI ची मोठी घोषणा

Abhijeet Khandekar