मुंबई : मनोरंजन क्षेत्रात कार्यरत झी एंटरटेन्मेंटचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात वधारताना दिसला आहे. इंडसइंड बँकेची देणी देण्याचे झी एंटरटेन्मेंटने मान्य केल्याचे समजले असून या बातमीचा सकारात्मक परिणाम समभागावर गुरुवारी पाहायला मिळाला. झी एंटरटेन्मेंटचा समभाग गुरुवारी 7 टक्के इतका वधारत बीएसईवर इंट्रा डेदरम्यान 203 रुपयांवर पोहचला होता. इंडसइंड बँकेने दिवाळखोरीची तक्रार मागे घेण्याचे मान्य केले आहे.


previous post
next post