जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जि. प. चा प्रयत्न : 2015 पासून उपक्रम सुरु
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्राsत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी देखील जिह्यातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
गत वर्षातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच या वर्षी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच जिल्हास्तरावरून पथकांमार्फत गावांना भेटी देवून उपक्रमाची पाहणी केली जाणार आहे. उपक्रमांतर्गत घरगुती गणेश विसर्जन आणि सार्वजनिक गणेश विसर्जनादिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत तालुका तसेच ग्राम पंचायत स्तरावर सुक्ष्म नियोजन केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील खातेप्रमुखांची तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याच पध्दतीने तालुकास्तरावरून संपर्क अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.
पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची परंपरा कायम राखताना जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात श्रींच्या मूती विसर्जनाचे नेटके नियोजन केले असून प्रत्येक तालुक्यात अधिकारी कर्मचारी याबाबत सक्रीय झाले आहेत. 1210 जुन्या विहीरी तर 901 काहींलीमध्ये मूर्ती विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान मूर्ती दान करणायांसाठी 163 कुंभार संबंधीत ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
पंचंगंगा नदीत मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन काही लोकप्रतिनिधीनी केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी प्रबोधनाबरोबरच, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे नियोजन केलेल्या ठिकाणीच मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान निर्माल्यासाठी 1131 ट्रक्टरची व्यवस्था करण्यात आली असून 193 घंटागाडींही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. निर्माल्यामधून खत निर्मीती व्हावी या उद्देशाने 1003 ठिकाणी खत निर्मीती केंद्रे करण्यात आली आहेत.
सर्वाधिक 185 विहीरी राधानगरी तालुक्यात असून त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील 162 विहीरींमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करवीर 111, चंदगड 118, शाहूवाडी 115, शिरोळ 83, भुदरगड 105, आजरा 19, गडहिंग्लज 78, हातकणंगले 77 गगनबावडा 29 विहिरींमध्ये मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.