वृत्तसंस्था/ हरारे
यजमान झिंबाब्वे आणि अफगाण यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका झिंबाब्वेत खेळविली जाणार असून या मालिकेसाठी शुक्रवारी झिंबाब्वे क्रिकेट संघटनेने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व क्रेग एर्विनकडे सोपविण्यात आले आहे.
उभय संघातील पहिला वनडे सामना 4 जून, दुसरा वनडे सामना 6 जून आणि तिसरा वनडे सामना 9 जूनला हरारे स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर होणार आहे. आयसीसीच्या वनडे सुपर लीग स्पर्धेच्या मानांकनात झिंबाब्वे 12 व्या स्थानावर आहे. हॉलंडचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. झिंबाब्वेने या स्पर्धेत 12 सामन्यांतून 35 गुण मिळविले आहेत तर अफगाण 70 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
झिंबाब्वे संघ- क्रेग इर्विन (कर्णधार), रेयान ब्युरेल, आर छकब्वा, टी. छतारा, टी. चिवांगा, जाँग्वे, टी. कैतानो, सी.मदांदे, डब्ल्यू मधेवेरे, मुझारबनी, मायर्स, नीडलोवू, सिकंदर रझा, एम.शुंभा आणि डोनाल्ड तिरिपानो.