Tarun Bharat

भारताविरुद्ध मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा

Advertisements

केएल राहुलकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा, 18 ऑगस्ट रोजी पहिली वनडे

हरारे /वृत्तसंस्था

पुढील आठवडय़ात भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेने 17 सदस्यीय संघ जाहीर केला. ही मालिका 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे.

यजमान झिम्बाब्वे संघाचा नियमित कर्णधार क्रेग एर्विन धोंडशिरेच्या दुखापतीमुळे अद्याप बाहेर असून तो भारताविरुद्ध आगामी मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व रेगिस चकबव्हाकडे सोपवले गेले आहे. अलीकडेच त्याने झिम्बाब्वेला बांगलादेशविरुद्ध 2-1 फरकाने विजय मिळवून दिला आहे.

मुझराबानी व तेंदाई चटारा हे जलद गोलंदाज देखील भारताविरुद्ध खेळणार नाहीत. शिवाय, डावखुरा फिरकीपटू वेलिंग्टन मासाकात्झा खांद्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. ही मालिका वर्ल्डकप सुपर लीग स्पर्धेचा भाग असणार असून दि. 18 रोजी पहिली वनडे हरारेत होईल. त्यानंतर शनिवार व सोमवारी पुढील 2 वनडे याच ठिकाणी होतील.

भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे

अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने यापूर्वी गुरुवारी भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवले आहे. शिखर धवन उपकर्णधार असेल, असे यावेळी जाहीर केले गेले.

झिम्बाब्वे वनडे संघ ः रेगिस चकबव्हा (कर्णधार), तनाका चिवंगा, बॅडली इव्हान्स, ल्यू जाँगवे, रियान बर्ल, इनोसन्ट काईया, कैतानो, क्लाईव्ह मदान्दे, वेस्ले मॅधेवेरे, मरुमनी, जॉन मस्रा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड नॅग्रव्हा, व्हिक्टर न्याऊची, सिकंदर रझा, मिल्टॉन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.

भारत-झिम्बाब्वे मालिकेची रुपरेषा

तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

18 ऑगस्ट / पहिली वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

20 ऑगस्ट / दुसरी वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

22 ऑगस्ट / तिसरी वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

Related Stories

वर्ल्डकपसाठी धोनी मानधन घेणार नाही!

Patil_p

ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या क्वारंटाईनवेळी टेनिसपटूंना सरावाची मुभा

Patil_p

जेव्हा यजुवेंद चहल क्रिकेटकडून पुन्हा बुद्धिबळाकडे वळतो!

Patil_p

तामिळनाडू- बडोदा यांच्यात आज जेतेपदासाठी लढत

Patil_p

विंडीज संघाला दंड

Patil_p

कोरोनाला हरवले, सुवर्णही जिंकले!

Patil_p
error: Content is protected !!