Tarun Bharat

झिम्बाब्वे संघ जाहीर, एर्विनकडे नेतृत्व

Advertisements

वृत्तसंस्था/ हरारे

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने 15 जणांचा संघ जाहीर केला. पेग एर्विनकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

मध्यंतरी एर्विनला दुखापत झाल्याने काही दिवस तो क्रिकेटपासून अलिप्त होता. पण ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाल्याने एर्विनकडे पुन्हा कर्णधारपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जणांच्या झिम्बाब्वे संघामध्ये वेगवान गोलंदाज मुझरबनी ब्लेसिंगचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर मुझरबनीला संधी देण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी झिम्बाब्वेच्या संघात तेन्दाई चतारा, वेलिंग्टन मासाकेझा आणि मिल्टन शुंभा यांचे पुनरागमन झाले आहे. मासाकेझा आणि शुंभा यांना यापूर्वी खांदा दुखापतीची समस्या जाणवत होती. पण आता ते या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले आहेत. अनुभवी रेगिस चकबवा, सिकंदर रझा, सिन विल्यम्स, ब्रॅडले इव्हॉन्स, टोनी मुनयोंगा, रिचर्ड नेग्राव्हा आणि क्लाईव्ह मदांदे यांचाही संघात समावेश आहे. टी. मेरुमणी, काइया इनोसेंट, केव्हिन केसुझा, व्हिक्टर नेयुची आणि टी. चिवांगा हे या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून राहतील. टी-20 विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा सलामीचा सामना 17 ऑक्टोबरला आयर्लंडबरोबर होबार्ट येथे खेळविला जाणार आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना 19 ऑक्टोबरला विंडीजबरोबर होईल. झिम्बाब्वेचा तिसरा सामना स्कॉटलंडबरोबर 21 ऑक्टोबरला खेळविला जाईल.

झिम्बाब्वे संघ- पेग एर्विन (कर्णधार), ब्युरेल रेयान, चकबवा रेगिस, सी. तेंदाई, इव्हॉन्स ब्रॅडले, जाँगवे लुक, मदांदे क्लाईव्ह, मधेवेरे वेस्ले, मासाकेझा वेलिंग्टन, मुनियोंगा टोनी, मुझरबनी ब्लेसिंग, नेगेव्हा रिचर्ड, सिकंदर रझा, शुंभा मिल्टन आणि सिन विल्यम्स, राखीव खेळाडू- सी. तनाका, काइया इनोसेंट, केसुझा केव्हिन, टी. मेरुमणी आणि एन. व्हिक्टर.

Related Stories

राजस्थानचा ‘वनवास’ संपुष्टात येणार का?

Patil_p

हॉकी इंडियातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

जडेजा-अश्विनवर आमचा फोकस असेल

Amit Kulkarni

सख्खे शेजारी आज पक्के वैरी!

Patil_p

शाब्बास! अटलांटा Cricket लिगमध्ये सांगलीच्या अंकुर माळीच्या टिमने मारली बाजी

Archana Banage

चेन्नईच्या खात्यावर असाही संयुक्त विक्रम

Patil_p
error: Content is protected !!