Tarun Bharat

राशी भविष्य

18-05-2022 ते 24.5.2022

मंगळ दोष नाहीच !!! अहो, मंगल योग म्हणा. .

Advertisements

 पत्रिका गुणमिलन करताना ज्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात त्यापैकी एक म्हणजे मंगळ दोष ! अर्थात हा दोष नाहीच. हा योग आहे. कुंडलीच्या बारा स्थानांपैकी 12, 1, 4,7 आणि 8 याठिकाणी जर मंगळ असेल तर ती कुंडली मांगलिक समजली जाते आणि मंगळ दोषाचा ठपका ठेवला जातो.(या लेखात मी ज्योतिष शास्त्रातील क्लिष्ट गोष्टींचा उल्लेख करणार नाही)  आपण ज्योतिष हे शास्त्र आहे  असं जेंव्हा म्हणतो तेंव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि शास्त्र हे कायम प्रगत होत असते. ते एका ठिकाणी थांबत नाही आणि जर ते थांबले तर ते संपते. हजारो वर्षापूर्वी ज्योतिष शास्त्रामध्ये ज्या संकल्पना होत्या त्या त्याच पद्धतीने आजही लागू होतात का याचा विचार आपण केला पाहिजे.  पूर्वी लढाया होणे हे अगदी सर्वसामान्य होते. ज्यांचा मंगळ चांगला आहे असे लोक सैन्यामध्ये भरती होत. लढायांमध्ये जखमा होणे, रक्तपात होणे, हात पाय कापला जाणे किंवा अपघात होणे किंबहूना मृत्यू होणे हे सहाजिक होते. तेव्हा या योगची तीव्रता मानली जायची. आज इतक्मया लढाया होतात का ? प्रत्येक घरातील एखादा तरुण सैन्यात आहे का? मग मंगळ योगा वरती ठपका का?  पूर्वीच्या काळचे सगळे नियम जर आत्ताच्या काळात लावले तर  एकही लग्न होणार नाही! मंगळ असल्याने कित्येकांची लग्न झालेली नाहीत. कित्येकांच्या लग्नाला उशीर झालाय. एखादी दुर्घटना घडली की मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेतल्या मंगळावर हा ठपका ठेवला जातो हे योग्य आहे का?  कित्येक शतके आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती राहिली. तुम्ही म्हणाल पत्रिकेतला मंगळाचा आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा काय संबंध आहे? सांगतो. मागे सांगितल्याप्रमाणे 12, 1, 4, 7 आणि 8 या ठिकाणी जर मंगळ असेल तर त्या पत्रिकेला मांगलिक म्हटले जाते. मुळात मंगळ ग्रह हा अत्यंत धाडसी , युद्धकुशल सेनानी पराक्रमी असा आहे. समजा मुलाच्या प्रथम भावात मंगळ असेल तर तो मुलगा धाडसी आहे पराक्रमी आहे, स्वबळावर नशीब घडणार आहे असे म्हणणार आणि हाच मंगळ जर मुलीच्या प्रथम भावात असेल तर मुलगी उध्धट, आहे कुणाला न जुमानणारीआहे ,गर्वि÷ आहे असं म्हणणार! मंगळ जर मुलाच्या चौथ्या घरात असेल तर तो स्व पराक्रमावर घर बांधणार आणि तेच जर मुलीच्या चौथ्या घरात असेल तर ही मुलगी घर  मोडणार!! मंगळ जर मुलाच्या सप्तम स्थानात असेल तर तो पुरुषासारखा पुरुष आणि तोच मंगळ जर मुलीच्या सप्तम स्थानात असेल तर मुलावर जोर करणारी!!! मंगळ अष्टमात असेल तर तरी काही विचारूच नका. अगोदरच अष्टम स्थानाला मृत्यू स्थान म्हटले जाते. त्यात मंगळ म्हणजे डायरेक्ट मृत्यूच? मंगळ जर 12 मध्ये असेल तर मुलगी अति कामुक आहे मुलाला झेपणार नाही अशाप्रकारे तर्क लावला जातो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी देश काल आणि परिस्थिती यांचा विचार केला पाहिजे. हे असं का असं विचारल्यावर ज्योतिषांनी पुस्तकांचा संदर्भ देऊ नये. कोणताही डॉक्टर किंवा इंजिनिअर किंवा वैद्य समस्या सांगितल्यानंतर पुस्तकातला दाखला देत नाही. ज्योतिषांनी ही तसे करू नये. यात आणखीन एक भयावह गोष्ट म्हणजे कम्प्युटर कुंडली मध्ये कुठलेही तारतम्य न वापरता किंवा ग्रहयोग न तपासता कुंडलीवर ’मांगलिक’ लिहिले जाते. तीच परिस्थिती वधुवर सुचक वेबसाईट ची आहे. जर अशाप्रकारे ग्रहयोग कळत असते तर ज्योतिषांचे काय काम? या सगळय़ामध्ये सगळय़ात भयानक प्रकार म्हणजे मंगळामुळे जोडीदाराचा मृत्यू होतो हा समज. ऐश्वर्या रायला मंगळ आहे म्हणून लग्न झाडाशी लावून दिले, विवाह करताना कुंभविवाह केला आणि मंगळ दोष गेला हे खरोखर हास्यास्पद आहे . एक साधी आकडेवारी पहा. मंगळा ची कुंडली ही प्रथम स्थानावरून, चंद्रावरून आणि त्याचबरोबर शुक्रा वरून पाहिली जाते .म्हणजेच 60 टक्के लोक इथेच मांगलीक झाले! दक्षिण भारतात दुसर्या आणि पाचव्या स्थानातील मंगळ हा ही दोषपूर्ण मानला जातो. म्हणजेच 80 ते 90 टक्के पत्रिका मांगलीक झाल्या.  हे पटतय का तुम्हाला? याही पुढे जाऊन सांगतो आपण सारेच मांगलिक आहोत. कसे ते पहा. मंगळाला एका राशीतून दुसऱया राशीत जाण्याकरता सहा ते आठ आठवडे लागतात म्हणजेच आयुष्यात कित्येकदा आपल्या पत्रिकेमध्ये गोचरीचा मंगळ हा 1,4 7, 8, 12 आणि या बरोबर 2 आणि 5 या स्थानात येऊन गेलाय!  म्हणजेच त्या काळापुरते आपण मांगलिकच होतो! मग मंगळाचा इतका बाऊ का? मंगळाची पत्रिका कशी बघायची, रवी, शनी, राहू आणि केतू यांचा जाब मंगळाला कसा विचारला जातो या तांत्रिक गोष्टींपेक्षा अनावश्यक भीती दूर करण्याचा उद्देश या लेखाचा आहे .लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात,  का घालतात हे माहिती आहे? मंगळसूत्रात पोवळे आणि काळे मणी असतात. म्हणजे मंगळ आणि शनी एकत्र आणले जातात! मंगळाचा धाडसीपणा आणि शनीची सेवावृत्ती असावी हा उद्देश असतो. मग हाच मंगळ अमंगळ कसे करेल? केवळ मंगळामुळे जर मृत्यू होत असेल तर मारक बाधक स्थाने  कशाला सांगितली आहेत? विवाह जुळवताना किंवा मंगळाचा विचार करताना वधू-वरांचे आयुष्यमान किती आहे हे बघणे महत्त्वाचे.  मंगळ योग तारतम्याने पहावा. शुभं भवतु.

महा उपायः दारू चे व्यसन अति भयानक रूप घेते. अशा कुटूंबाचे हाल बघवत नाहीत. हा मानसीक आजार आहे असे समजून वैद्यकीय उपचारा सोबत हा उपाय करून बघा. व्यक्ती जी दरु पिते त्या ब्रँडचीच दारू ची बाटली, व्यक्ती गाढ झोपलेली असताना तिच्या वरून् 7 वेळा उतरवून् भैरव मन्दरात चढवावी. पुजार्याला पैसे देउन तीच बाटली परत घ्यावी आणि पिंपळा च्या झाडा खाली पुरावी.

सोपी वास्तू टिपः देवघरात  श्री गणपती, केलदैवत, गोपाळ  कृष्ण, अन्नपूर्णा आणि आरध्य दैवत यांच्या मूर्ती असाव्यात. जास्त फ़ोìाs, मूर्त्या नकोत.

 मेष

येणाऱया दिवसात तुमचे वागणे आत्मविश्वासपूर्ण असेल. कुटुंबातील व्यक्तींच्या मतभेदांमुळे तुमचे मन खट्ट? होऊ शकते. प्रवासाला जाताना एखादी वस्तू विसरून गेल्यामुळे प्रवासात त्रास होऊ शकतो. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. प्रमोशन देखील होऊ शकते. वैवाहिक जीवनात मात्र थोडी कुरबुर राहील. भाग्याची साथ आहे.

उपाय देवीच्या चरणांवर सात लवंगा वहा

 वृषभ

जंतुसंसर्गामुळे किंवा प्रतिकारशक्?ती कमी पडल्यामुळे छोटे आजारपण येऊ शकते. सावध रहावे. प्रवास  टाळावा .अपरिहार्य कारण असेल तर सोबतीला एखादा माणूस घेऊनच प्रवास करावा. धनप्राप्ती सहज होणार नाही. जमिनीच्या व्यवहारांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळणे कठीण दिसते. संतति विषयक जर समस्या असतील त्या सुटतील.

उपाय मारुतीला बुंदीच्या लाडवा चा नैवेद्य दाखवावा

मिथुन

वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. गुप्त बातमी कळू शकते.  पथ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजार बळावू शकतो. अपेक्षा नसताना धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमींनी सावध राहावे. नोकरीत मनस्ताप संभवतो. वाहन चालवताना सावध राहावे. तीर्थक्षेत्राला भेट द्याल.

उपाय गायीच्या पायाखालची माती जवळ ठेवावी

कर्क

गेले काही दिवस तब्येतीविषयी चिंता वाटत होती ती दूर होईल. एखाद्या छोटय़ा घटनेमुळे घरातील वातावरण थोडे बिघडू शकते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. शेअर्स मध्ये गुंतवणूक टाळावी. विरोधक बलवान होत आहेत. सांभळा. नोकरीत मनासारखी घटना घडेल. विवाह सुख उत्तम प्राप्त होईल. मनातील योजना कोणालाही सांगू नका. उपाय उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे

 सिंह

मनावरचा ताण आणि अतिविचार यामुळे तब्येत बिघडू शकते. मनपसंत खाण्यापिण्याचा आस्वाद घ्याल. घरातील वातावरण सुखमय असेल. लिखाणात चूक होऊ शकते. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. कलाकारांना आणि खेळाडूंना उत्तम दिवस आहेत. नोकरीतील समस्या दूर होऊन पैशांची आवक वाढेल. वैवाहिक जीवन उत्तम.

उपाय शंकराला पांढरी फुले वाहतात

कन्या

उत्तम आहार आणि व्यायाम याबद्दल जागरूक राहण्याने स्वास्थ्य सुधारायला वेळ लागणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे बोलणे खटकू शकते. काम धंद्याच्या ठिकाणी एखाद्या भांडणामुळे चिडचिड होऊ शकते. जमीन आणि वाहन खरेदी करता योग्य वेळ आहे. शेअर्स मधून लाभ संभवतो. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील.

उपाय गोशाळेमध्ये चारा दान करावा

 तूळ

हलगर्जीपणामुळे तब्येतीचे नुकसान होऊ शकते. ऐकलेली प्रत्येक बातमी खरीच असेल असा विश्वास ठेऊ  नका. बोलताना शब्दांची निवड योग्य करा. आहार-विहार यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. व्यवसायिक कारणाने प्रवास होऊ शकतो. आई कडून मदत मिळेल. प्रेमींना अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.

उपाय शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा

 वृश्चिक

एखाद्या इन्फेक्शन मुळे पोटाचे आजार संभवतात. धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासातून लाभाचे योग आहेत. जमिनीसंबंधी व्यवहार यशस्वी होतील. छोटय़ा गुंतवणुकीमध्ये नुकसान संभवते. कामाच्या ठिकाणी एखादा विवाद होऊ शकतो. वैवाहिक जोडीदार तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही .

उपाय तुरटी चा तुकडा जवळ ठेवावा

 धनु

पूर्वी होऊन गेलेला एखादा आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. तुमच्यातील कला गुणांमुळे तुमचे नाव होईल .लेखी कामात यश मिळेल. प्रवास घडू शकतो. प्रेमींनी र्तवणूक योग्?य ठेवावी. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. जोडीदाराशी पटणार नाही. लाभाच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

उपाय गरजू निर्धन व्यक्तीला आर्थिक मदत करावी

 मकर

आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल काळ आहे त्याचा फायदा उचलावा. धनप्राप्तीतील अडचणी दूर होऊन पैशांची आवक वाढेल. मातृ सुख मिळेल. प्रेमात फसवणुकीचा योग होत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक टाळावी. नोकरीत एखाद्या चुकीमुळे बोलणी खावी लागू शकतात पण भाग्याची साथ असल्याने जास्त त्रास होणार नाही. उपाय अन्नदान करा

 कुंभ

मन आनंदी ठेवल्यास कोणतेही काम अवघड वाटणार नाही. प्रवास करत असताना सावध राहावे. फोनवर बोलताना किंवा सोशल मीडिया वरती कमेंट करताना योग्य शब्द वापरा. प्रेमींना आपला गैरफायदा घेतला जात आहे का असे वाटू शकते. नोकरीत आपले काम चोख करावे. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

उपाय जखमी जनावरांच्या इलाजा करता मदत करावी

 मीन

व्यवसायिक आडाखे चुकू शकतात. भरवशाच्या माणसांनी दगा दिल्याने नुकसान संभवते. तब्येतीची हेळसांड करू नका. अति प्रवास टाळावा. छोटय़ा गुंतवणूकीतून लाभ संभवतो. नोकरीत एखादा कटू अनुभव येऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मानल्यामुळे फायदा होईल. मान सन्मान वाढेल.

उपाय आंघोळीच्या पाण्यात हळद घालून अंघोळ करा.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार 26-12-2020

Omkar B

आजचे भविष्य सोमवार दि. 4 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.23 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 22-10-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि.30 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 एप्रिल 2020

Patil_p
error: Content is protected !!