29-06-2022 ते 5-7-2022
ऋणानुबंधाच्या गाठी पितृ ऋण पितृदोष आणि बरंच काही. . .
(भाग -4 सारांश )
8. अज्ञाताचे ऋण- भेटेल त्या माणसाला धोका दिल्याने किंवा एखाद्याचा नाश केल्याने हे ऋण लागू होते .याचे लक्षण म्हणजे घराच्या दक्षिण दरवाजाच्या जवळपास दफनभूमी असणे किंवा भट्टी असणे, घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर किंवा खालून गटार जाणे. याचा परिणाम म्हणजे व्यक्तीला जिथे न्याय मिळायला हवा तिथूनच अन्याय मिळतो घरात कळय़ा रंगाचे एखादे जनावर, जसे की कुत्रा किंवा मांजर पाळले असेल तर त्याचा मृत्यू होतो खोटे आरोप लागतात हाताच्या नखांना इजा होते ,नखे तुटतात. यावर उपाय म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याकडून एक नारळ घेऊन एकाच वेळी समुद्रात प्रवाहित करणे
9. दैवी ऋण- दुसऱयांच्या मुलांना त्रास दिला असेल किंवा कुत्र्याची हत्या केली असेल तर हे ऋण लागू होते. यामध्ये संततीला भयंकर त्रास होतात. यावर उपाय म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याकडून समान रक्कम घेऊन जमेल तितक्मया कुत्र्यांना खाऊ घालणे, आजारी, अपंग कुत्र्यांची सेवा करणे, त्यांच्या दवा पाण्याचा खर्च उचलणे, काळय़ा रंगाचा कुत्रा पाळणे.
या सगळय़ा दोषांवरती समान उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली चार वातींचा दिवा लावणे, नवनाग स्तोत्रा चे शक्मय तितके पाठ करणे, घरी रुद्र करून घेणे, महामृत्यु?जय मंत्राचे पठण करणे, पितृ स्तोत्राचा पाठ करणे, आवळा पिंपळ या सारख्या पवित्र झाडांना लावणे त्यांची देखभाल करणे, श्रीमद्भागवताचा पाठ करून घेणे किंवा त्यात सहभागी होणे, पितरांच्या नावाने हॉस्पिटल, मंदिर, धर्मशाळा इथे दान देणे, गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, तिथीप्रमाणे ( तारखेप्रमाणे नाही) श्राद्ध करणे, महालयात न चुकता श्राद्ध करणे आणि मुख्य म्हणजे चारित्र्य शुद्ध ठेवणे आणि पितरांचा मान करणे. यातील काहीही पैशा अभावी किंवा इतर् काही कारणाने जमत नसेल तर दर अमावस्येला खुल्या आकाशा खाली दोन्ही हात वर करून (काखा वर करून ) सगळय़ा पितरांना स्मरून क्षमेची, रक्षण, पालन, पोषण करण्याची प्रार्थना करावी
पाप आणि पुण्याच्या व्याख्या अनेक असतील पण सर्वोत्तम व्याख्या “अष्टादशपुराणानां सारं व्यासेन कीर्तितम् ।परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।।” अशी आहे. म्हणजे अठरा पुराणांचे सार व्यासांनी एका वाक्मयात सांगितलं, दुसऱयावर उपकार करणे किंवा दुसर्
याची मदत करणे हे पुण्य आणि दुसऱयाला त्रास देणे किंवा पिडा देणे म्हणजे पाप. आता आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला पापा चा बॅलन्स वाढवायचा की पुण्याची ठेवी वाढवायची. कारण शेवटी फ़ेडायला आणि भोगायला आपल्यालाच लागणार आहे. शुभं भवतु
महा उपाय कित्येक वेळा नोकरीत प्रमोशन अडते पात्र असूनही इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन अडवले जाते अशावेळी जितकी वर्षे नोकरी केली आहे तितकी गोमती चपे श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा 108 वेळा जप करू शिवलींगा वरती चढवावी
सोपी वास्तु टीप हिरण्यकश्यपूला मारत असलेल्या नरसिंहाचे किंवा छाति फाडुन उभ्या असलेल्या हनुमंताचे चित्र घरी असू नये
मेष
आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्यामुळे खुश व्हाल. तब्येत सुधारण्या कडे विशेष लक्ष द्यावे असे वाटेल. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धनप्राप्ती साठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कुटुंबात वाद संभवतात. नोकरदार करता अनुकूल काळ आहे. छोटय़ा दुखापती पासून सावध रहा. मित्रांमुळे खर्च वाढेल.
उपाय गाईला कुंकवाचा टिळा लावावा.
वृषभ
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य ची समस्या येऊ शकते. न मागता दिलेला सल्ला उपहासाला कारणीभूत ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मन वळवावे लागेल. प्रवास टाळावा. वाहन घेण्याची इच्छा असेल तर वेळ अनुकूल आहे. प्रेमींना उपहार मिळेल. नोकरीत वरि÷ खूश होतील. वैवाहिक जीवनात तणाव असेल. जवळच्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.
उपाय शुक्रवारी कुमारी पूजन करावे
मिथुन
पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील. काही ठिकाणी निर्णय घेण्यात चूक होऊ शकते. वसुलीचे पैसे पूर्ण मिळणार नाहीत. प्रवासाचे योग आहेत. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नोकरदारांना आपले म्हणणे वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. गटबाजी पासून दूर राहा. मान सन्मान प्राप्त होईल.
उपाय तृतीयपंथी व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा
कर्क
पाठीचे किंवा मणक्मयाचे दुखणे त्रास देऊ शकते. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. पैशाच्या बाबतीत सर्वसाधारण काळ आहे. छोटा प्रवास होऊ शकतो. नोकरदार वर्गाने चूक होऊ नये म्हणून सांभाळून रहावे. वैवाहिक जीवनात सुखी आणि संतुष्ट असाल. एखाद्या बातमीचा परिणाम मनावर होऊ शकतो. धार्मिक आस्था वाढेल. मित्रांकडून अपेक्षाभंग होईल. उपाय गाईला चपाती आणि खीर खाऊ घालावी
सिंह
अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्मयता आहे. आरोग्य ठीकठाक राहील. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. शनिवारी प्रवास टाळावा. प्रेमींनी शुल्लक कारणावरून वाद घालणे टाळावे. नोकरीतील काही घटनांमुळे मन सुखावून जाईल. गुप्त शत्रूंचे कारस्थान उधळून लावायचा प्रयत्न करा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. भाग्य उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी अपमान होऊ देऊ नका.
उपाय देवासमोर लावलेल्या दिव्यात तीन लवंगा घालाव्यात
कन्या
वैवाहिक सुखाच्या दृष्टीने सुखदायक काळ आहे. व्यवसायिक भागीदारीमुळे फायदा होईल. सोमवार मंगळवार कामाचा व्याप वाढणार आहे. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून लाभात ची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. नोकरीत कामे वेळेवर पूर्ण होतील. ठेच लागणे किंवा अडखळणे यातून लहान मोठी दुखापत होऊ शकते. कोणताही धाडसी निर्णय सध्या घेऊ नका.
उपाय जांभळा रुमाल जवळ ठेवावा
तूळ
जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. नोकरदार वर्गाला इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकते. कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जोडीदाराला अनेक गोष्टींमध्ये मदत कराल. परदेश गमना साठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. एखादी आवडती वस्तू हरवण्याची शक्मयता आहे, सावध राहावे.
उपाय 5 वेलदोडे पाकिटात ठेवावे
वृश्चिक
बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल. लेखन कार्यात यश मिळेल. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. संततीची चिंता मिटेल. खेळाडूंना आणि कलाकारांना अनुकूल वेळ आहे. नोकरीत वरि÷ांकडून कौतुक होईल. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्यावा. ओळखीच्या लोकांकडून फसवणुकीची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनामध्ये कटू प्रसंग येथील.
उपाय तांब्याचा शिक्का पाण्यात सोडावा.
धनु
हलगर्जीपणामुळे आरोग्य बिघडू शकते. कोणत्याही आजाराला हलक्मयात घेऊ नका. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. एखाद्याचा हट्ट पुरवावा लागेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. मातृतुल्य स्त्रीच्या सल्ल्याने फायदा होईल. प्रेम प्रसंगात यश मिळेल. लाभ होतील. नोकरीत नको तो प्रसंग येऊ शकतो. नावलौकिक बिघडू देऊ नका.
उपाय गाईला हळदीचा टिळा लावावा
मकर
स्वास्थ्य उत्तम राहील नवीन प्रकल्पांबद्दल उत्साही असाल. कुटुंबातील सदस्यांना सांभाळून घ्यावे लागेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. मातृ सुख लाभेल. चुकुनही शेअर्स सारखा गुंतवणुकीत पैसे अडकवू नका. प्रेम प्रसंगात वादाचे प्रसंग निर्माण होऊन दूरता निर्माण होऊ शकते. कुलदेवतेचे दर्शन घ्यावे असे वाटेल. मानसन्मानात वाढ होईल.
उपाय पाण्यात काळे उडीद घालून आंघोळ करा
कुंभ
ज्या संधींच्या प्रतिक्षे मध्ये तुम्ही होता त्या संधी प्राप्त होतील. आरोग्याचा पाया ठीकठाक असेल. धनप्राप्ती उत्तम होईल. कुटुंबात मंगल कार्य संभवते. प्रवासातून फायदा होईल. आई बद्दल चिंता वाटेल. जमिनीचे व्यवहार टाळावेत. गुंतवणुकीमध्ये सावध असावे. प्रेमात मनाविरुद्ध घटना घडेल. नोकरीत सहकारी चुका दाखवतील. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. अपघातापासून सावध असावे.
उपाय पांडुरंगाला तुळस अर्पण करा
मीन
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. जुने येणी वसूल होतील. प्रगतीच्या वाटा सापडतील. सही करताना किंवा कागदोपत्री व्यवहारात अत्यंत सावध असावे. पितृ चिंता वाटेल. सगळय़ा प्रकारच्या लाभाची शक्मयता आहे. संधींचे सोने करावे. वडील भावंडांची मदत मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. वैवाहिक जीवनात संतुष्ट असावे.
उपाय खंडोबाचे किंवा ज्योतिबाचे दर्शन घ्यावे