काल सर्पाची पुंगी!!! वाजवतो कोण आणि वाजते कुणाची
नमस्कार. पुन्हा एकदा एका वादग्रस्त विषयाला हात घालतोय. बऱयाच जणांचा या लेखाला विरोध होईल हे माहिती असून सुद्धा सत्य ज्योतिषाचा वसा घेतल्याने हा लेख लिहितोय. कालसर्प दोष असतो का? तर नाही! नाही!! नाही!!! त्रिवार नाही. हा दोष तर नाहीच नाही, याचा सापाशी काहीही संबंध नाही. अगदी हल्ली हल्ली म्हणजे 70 – 80 च्या दशकात शोध लागलेला हा एक सामान्य योग आहे. वास्तविक दृष्टीने पाहता राहुचे नक्षत्र भरणी आणि त्याची देवता यमराज म्हणजे काल आहे, केतूचे आश्ल?षा नक्षत्र आणि त्याची देवता सर्प आहे म्हणून हा काल सर्प योग म्हटला जातो. जुन्या ज्योतिषीय ग्रंथात ( योगः प्रोक्तः कालसर्पश्च्य.. चा अपवाद सोडल्यास) याचा कुठेही उल्लेख नाही. संपूर्ण ज्योतिष जगतामध्ये याला मानणाऱयांची संख्या जास्त आहे. अगदी प्राध्यापक के. एन. राव सारख्या विद्वानांनी सुद्धा याच्या अस्तित्वाला नकार दिला आहे. या लेखाचा उद्देश कोणाच्याही व्यवसायाला धक्का लावण्याचा नसून कालसर्प च्या नावाखाली भीती घालून लुबाडणाऱया लबाड पाखंडी लोकांना आवर घालण्याचा आहे. कालसर्प च्या नावाखाली जातकाची जी लाखो रुपयांची लूट केली जाते त्याबद्दल निषेध स्वरूपात हा लेख पाहिला जाऊ शकतो. जातकांच्या भोळय़ा विश्वासाचा काही ज्योतिषी जो अनैतिक फायदा उचलतात त्याबद्दल लोकांना जागरूक करणे हे कर्तव्य समजून मी हे लिहित आहे . यात जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माझा नाइलाज आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ज्या सापाला शंकराने स्वताच्या गळय़ामध्ये स्थान दिले, ज्या सापाच्या शय्ये वरती श्री महाविष्णु शयन करतात, ज्या सापाची नागपंचमीला शेतकऱयांचा मित्र म्हणून आपण पूजा करतो तो साप किंवा सर्प योग आपले वाईट कसे करेल हा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही! कदाचित आपल्या रक्तात भिनलेली सापाविषयी असलेली भिती हे कारण असावे. भारतीय योगशास्त्रात कुंडलिनी शक्ती ला ’सापाचे स्वरूप असलेली’ असे वर्णन केले गेले आहे. कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर माऊली याचे वर्णन ’सापाचीये पिल्ले कुंकूमे नहाले’ असे करतात. चायनीज ज्योतिष शास्त्रात ड्र?गन किंवा सापाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. ज्योतिष शस्त्रात जी आपण कुंडली म्हणतो ती कुंडली म्हनजेच ’बैठक’! आणि तरी ही वाइट??? आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आणि अभ्यास आहे कोणावर ही माझे मत लादण्याचा प्रयत्न नाही. कोणत्याही विषयावर आपले मत मांडत असताना मत ठाम असावे ,तळय़ात मळय़ात हा प्रकार नसावा म्हणूनच काही मुद्दे पहिल्यांदाच स्पष्ट करतो. हे मुद्दे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सादर करतोय. ते आपण पुढच्या भागात पाहूया
(ता. क. संपूर्ण लेख माला वाचूनच आपले मत ठरवावे)
महा उपाय
दुर्भाग्य नाशक तोडगाः कणकेचा दिवा व त्यात 2 वाती, 1 लिंबू, 7 लाल मिर्च्या, 7 लाडू, 2 लवंगा, 2 वेलदोडे केळीच्या पाना वर ठेऊन प्रार्थना करावी की ’ हे दुर्भाग्या माझ्या सोबत चलावे’. नंतर 4 रस्ते जिथे मिळतात तेथे जाउन सामान खाली ठेवावे व प्रार्थना करावी की ’ इथून पुढे तुला चारी दिशा मोकळय़ा आहेत, पुन्हा माझ्या मागे येऊ नको’. मागे न बघता परत येऊन हात पाय धूऊन घरी जावे
सोपी वास्तू टिपः चांदी चे 2 हत्ती दरवाजाच्या बाहेर च्या बाजूला तोंड करून् लावावेत. लक्श्मी प्राप्ती सठी अचूक तोडगा आहे.
मेष
तब्येतीची उत्तम साथ असली तरीसुद्धा निष्काळजीपणा नको. स्वभावामध्ये उतावळेपणा येईल. घरात छोटे मोठे भांडण होऊ शकते. पैशांची आवक मनासारखी असणार नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठाचा त्रास संभवतो. पैसा गुंतवताना खात्री करून घ्या. वैवाहिक जीवन मनासारखे असेल. छोटय़ा-मोठय़ा अपघातापासून सावध रहा. मित्रांसोबत वेळ घालवाल.
उपाय मंदिरात दुधाचे दान द्यावे
वृषभ
येणाऱया काळात तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पोटाचे विकार, डोकेदुखी त्रास देऊ शकते. घरातील व्यक्तींचा विरोध सहन करावा लागेल. प्रवासात वाहन दुरुस्ती येऊ शकते. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून नुकसान होईल. जुनी येणी वसूल होऊ शकतात. नोकरदार वर्गाला अनुकूल वेळ आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
उपाय गाईला चपाती आणि गुळ खाऊ घाला
मिथुन
सगळय़ा प्रकारच्या लाभां करता अनुकुल काळ आहे. समाजात मान सन्मान वाढेल. पद प्रति÷ा प्राप्त होईल. छोटय़ा गुंतवणूकीतून लाभ संभवतात. नोकरीमध्ये संधी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर उत्तम काल आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोटय़ा गोष्टींवरून वाद संभवतो. जवळच्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. भाग्याची उत्तम साथ आहे. खर्चाचे प्रमाण कमी कराल. उपाय मारुतीला पंचामृताचा अभिषेक करावा
कर्क
पैशांच्या बाबतीत दिलेले आश्वासन लोकांनी न पाळल्याने राग येईल. घरातील वृद्ध व्यक्तींशी वाद संभवतो. प्रवास करणे शक्मयतो टाळावे. प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल वेळ आहे. प्रेमींसाठी अनुकूल काळ आहे. संततीकडून सुवार्ता मिळेल. शेअर्स मधून लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सांभाळून रहावे. वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. मानसन्मान प्राप्त होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी आहे.
उपाय गुरुवारी हळद घातलेले पाणी तुळशीला घाला
सिंह
अतिआत्मविश्वास नडू शकतो. गर्वि÷ बोलण्यामुळे होणारे काम अडू शकते. कुटुंबात वादावादीचे प्रसंग येतील. स्थावर प्रॉपर्टीच्या बाबतीत अडचणी दूर होतील. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ होईल. प्रेमात सफलता मिळेल. नोकरदार वर्गाला आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. भागीदारी मध्ये फायदा होईल. वाहन जपून चालवावे.
उपाय केळीच्या झाडाचे पूजन करावे
कन्या
आरोग्याची छोटी-मोठी तक्रार सतावू शकते. आत्मविश्वास आणि ताकत कुठेतरी कमी पडते असे वाटेल. पैशांची आवक उत्तम असेल. लांबच्या नातेवाईकांशी फोनवर बोलणे होईल. प्रवास घडेल. आई बद्दल चिंता वाटू शकते. प्रेमींना उपहार मिळेल. शेअर्स मधून लाभाची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय मजुरांना ताक दान द्यावे
तूळ
कौटुंबिक सुख आणि धनप्राप्ती च्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. कुटुंबातील जे÷ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. प्रवासात दुखापत होऊ शकते. वाहन सुख उत्तम मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. संततीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा सहयोग मिळेल. वैवाहिक जीवनात सुख समाधान राहील. गुप्त शत्रु कारस्थान रचून शकतात.
उपाय गाईला हिरवा चारा खाऊ खायला
वृश्चिक
बरेच दिवस रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. तब्येतीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जवळील व्यक्ती पैसे बुडण्याची शक्यता आहे. प्रवासाचे उत्तम योग आहेत. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत असलेले प्रश्न मार्गी लागतील. प्रेमीं करता आनंदाचा काळ आहे. संततीकडून आनंद प्राप्त होईल. नोकरदार वर्गाने आपण केलेली कामे वरिष्ठापर्यंत पोहोचवावीत. वैवाहिक जीवनात तणाव राहील.
उपाय मसूर दान करावेत
धनु
छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. वेळेवर उपचार करून घ्या. धनप्राप्ती मधील अडथळे दूर होतील. कौटुंबिक वातावरणात गोडवा येईल. धाकटय़ा भावंडांची साथ मिळेल. प्रवासाबद्दल प्लॅनिंग कराल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदारांनी सावध राहावे. कामाच्या ठिकाणी नाव खराब होऊ देऊ नये याची काळजी घ्या.
उपाय पाच फळांचे दान द्यावे
मकर
प्रवासामधून धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. मानसन्मानाचे चांगले योग आहेत. सगळय़ा प्रकारचे लाभ मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. मोठय़ा भावंडांची मदत मिळेल. तब्येतीचा पाया मजबूत राहील. प्रवासाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्ते बद्दल अनुकूल काळ आहे. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहावे.
उपाय छाया दान करा
कुंभ
तब्येत आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने आहे. पैशाची आवक वाढेल. कुटुंबात एखादा छोटा समारंभ साजरा कराल. प्रवासामधून फायदा होईल. मातृ चिंता असेल. जमिनीबद्दल चे व्यवहार सध्या करू नका. वाहना करता खर्च करावा लागेल. प्रेमींनी सांभाळून रहावे. शेअर सारखी धोकादायक गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला सहकर्मीं कडून त्रास संभवतो तुमच्या चांगल्या कृतीमुळे मान वाढेल.
उपाय दुरंगी कांबळे दान करावे
मीन
पायाला इजा होण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहावे. बाकी तब्येत सुधारेल. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न जरूर करावा. कुटुंबाची साथ मिळेल. प्रवास करणे टाळावे. लहान भावाशी वाद संभवतो. लहान सहान कारणांवरून प्रेमीं मध्ये वाद होईल. नोकरीत कामाच्या बाबतीत चोख असावे. जोडीदाराबरोबर चर्चेतून मार्ग निघेल. भाग्य साथ देत आहे, संधींचा लाभ घ्यावा.
उपाय मंदिरात बत्तासे दान करावे \
0 1. कालसर्प हा दोष आहे का? उत्तरः नाही. अजिबात नाही. इतर सामन्य योगां प्रमणे हा योग असू शकतो आणि त्या बद्दल ही मतभेद आहेत.
2. सापाचा याच्याशी काही संबंध आहे का? उत्तरः नाही अजिबात नाही. राहू आणि केतू यांच्यामध्ये सगळे ग्रह आले की या योगा ची निर्मिती होते आणि राहू आणि केतू यांना ड्र?गन्स हेड आणि ड्र?गन्स टेल म्हणजे सापाचे डोके आणि धड अशी संज्ञा आहे आणि केवळ याच कारणाने कदाचित याचे नाव कालसर्प ठेवले गेले असावे.
3. किती टक्के लोकांच्या जन्मपत्रिकेत हा योग असतो? उत्तरः कालसर्प योगाचे प्रकार जर पाहिले तर सरासरी 30 ते 45 टक्के लोकांच्या कुंडलीत हा योग असतो.