Tarun Bharat

राशीभविष्य

 13-7-2022 ते 19.7.2022 पर्यंत

कालसर्पाची पुंगी! वाजवतो कोण आणि वाजते कुणाची (भाग 2-वास्तविकता)

मुद्दे प्रश्नोत्तराच्या स्वरूपातः 1. कालसर्प हा दोष आहे का? उत्तरः नाही. अजिबात नाही. इतर सामन्य योगांप्रमाणे हा योग असू शकतो आणि त्याबद्दलही मतभेद आहेत. 2. सापाचा याच्याशी काही संबंध आहे का? उत्तरः नाही, अजिबात नाही. राहू आणि केतू यांच्यामध्ये सगळे ग्रह आले की या योगाची निर्मिती होते आणि राहू आणि केतू यांना ड्रगन्स हेड आणि ड्रगन्स टेल म्हणजे सापाचे डोके आणि शेपटी अशी संज्ञा आहे आणि केवळ याच कारणाने कदाचित याचे नाव कालसर्प ठेवले गेले असावे. 3. किती टक्के लोकांच्या जन्मपत्रिकेत हा योग असतो? उत्तरः कालसर्प योगाचे प्रकार जर पाहिले तर सरासरी 30 ते 45 टक्के लोकांच्या कुंडलीत हा योग असतो. 4. या योगाने माणूस मरतो किंवा त्याला असाध्य रोग होतो किंवा तो दरिद्री होतो असे असते का? उत्तरः नाही असे अजिबात नाही उलट या योगाच्या प्रभावाने जातकाला सगळय़ा प्रकारची सुखेसुद्धा प्राप्त होतात. 5. हा योग कसा ओळखावा? पत्रिकेच्या केवळ साध्या अभ्यासाने या योगाचे निदान करणे शक्मय नाही. ग्रहांची डिग्री, ग्रहांची अवस्था, त्यांनी ग्रहण केलेले स्थान, राहूचे तोंड कुठल्या दिशेला आहे ती दिशा, करण, योनी वगैरे सगळय़ा गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतरच या योगाला पुष्टी दिली जाऊ शकते. 6. या योगाची शांती करणे गरजेचे असते का किंवा करावीच लागते का? उत्तरः पारंपरिक शास्त्रामध्ये तिथी, नक्षत्र, योग, करण यांच्या बरोबरच ग्रहशांती हा प्रकारसुद्धा आहे. मला यावर आक्षेप नाही पण अमुक ठिकाणीच जाऊन तमक्मया माणसाकडूनच शांती करून घ्या वगैरे गोष्टींना माझा विरोध आहे. ज्या लोकांना शांती करून घेणे आर्थिक किंवा इतर काही कारणाने शक्मय नसते त्यांनी काय करावे? या योगाची शांती करणे अजिबात गरजेचे नाही. अगदी साध्या उपायांनी सुद्धा याच्या नकारात्मक  परिणामांना नाहीसे किंवा कमी करता येते. ज्योतिषशास्त्राच्या वेगवेगळय़ा ग्रंथांमध्ये वेगवेगळे जे योग वर्णन केलेले आहेत जसे की निश्कुंभ योग,  षटक योग,  पुनरफू योग, लक्ष्मी योग, अंगारक योग त्याप्रमाणे हा एक साधा योग म्हणून आपण विचार करू शकतो. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असतो, हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे  त्याच्या हातावर  मनगटाकडे माशाच्या आकाराचे चिन्ह असते.  बृहत पराशर होराशास्त्र, भावार्थ रत्नाकरपासून जेमिनी, वराहमिहीर, पूर्व कालामृत, उत्तर कालामृत (हे दोन ग्रंथ महाकवी कालिदासाने लिहिलेले आहेत.  तो  महान ज्योतिषीही होता) सर्वार्थ चिंतामणीपर्यंत जे 18 ज्योतिष विषयाचे संदर्भ ग्रंथ प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत त्यात कालसर्पचा कुठेही उल्लेख नाही मग हे प्रकरण आणले कुणी? आणि कधी?  ज्योतिषशास्त्रामध्ये वेळोवेळी विद्वानांनी जे योगदान दिले आणि ग्रंथनिर्मिती केली त्यामध्ये नवीन बऱयाच गोष्टींचा समावेश केला गेला. त्यापैकी काही विधायक होत्या तर काही विघातक सिद्ध झाल्या. ज्या शोधांनी लोकांची हानी केली त्यापैकीच हा एक कालसर्प योग.  सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये ही टूम निघाली. कुणाच्यातरी सुपीक डोक्मयात ही गोष्ट आली की राहू आणि केतू यांच्या डावीकडे किंवा उजवीकडे जर सगळे ग्रह आले तर त्याला सापासारखा आकार दिसतो आणि त्यात राहूची आदी आणि प्रत्यादी देवता काल आणि सर्प आहे त्यावरून ’कालसर्प’ हे नाव निघाले. आधी उल्लेख केलेल्या ग्रंथांमध्ये कालसर्प तर सोडाच पण काल हा शब्द दोषाच्या किंवा योगाच्या अनुषंगाने एकदाही आलेला नाही.

महाउपाय बऱयाच वेळेला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची अन्नावरील वासना उडून जाते. अशावेळी वैद्यकीय उपचारांबरोबरच खालील उपाय करून पहावा. ती व्यक्ती जेवायला बसल्यानंतर ताट वाढून झाल्यानंतर त्या ताटातील प्रत्येक पदार्थ एका द्रोणात काढावा, त्यावर थोडे काळे उडीद, काळे तीळ, कुंकू, गुलाल टाकून त्यावर कापूर पेटवावा एक उदबत्ती पेटवून त्यात लावावी आणि या द्रोणाचा उतारा व्यक्तीच्या डोक्मयावरून सात वेळेला क्लॉकवॉइज आणि एक वेळा अँटी क्लॉकवाईज करून तो द्रोण निर्मनुष्य जागेला टाकून द्यावा.

सोपी वास्तूटीपः घरातील सदस्यांना कामात अडथळे येत असतील किंवा काम करण्यामध्ये पूर्ण ऊर्जा लागत नसेल तर अशावेळी आग्नेय कोपऱयामध्ये दोष असतो. अशावेळी आग्नेय कोपऱयात एक लाल दिवा लावावा.

मेष

 अति घाई संकटात नेई हे विसरून चालणार नाही. या काळामध्ये तुम्ही फसले जाऊ नये म्हणून सावध राहणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर कोणाला फसवून देखील चालणार नाही. तब्येतीची साथ उत्तम असेल. धन आगम कष्टाने होईल. नोकरदारवर्गाला वरि÷ांकडून शाबासकी मिळेल. वैवाहिक जीवनात मात्र थोडा तणाव असेल. एखादी गुप्त बातमी कळू शकते. वाहन अतिशय जपून चालवा.

उपाय लाल फळ दान द्यावे.

वृषभ

जमिनीचे व्यवहार करत असाल किंवा घर घेण्याचे स्वप्न बघत असाल तर अनुकूल काळ आहे. खास करून नोकरदारवर्गाला कष्टाचे योग्य फळ मिळेल. गुप्त शत्रूंची संख्या वाढत आहे, त्यामुळे सावध राहणे केव्हाही उत्तम. वैवाहिक जोडीदाराकडून सगळय़ा प्रकारचे सहकार्य लाभेल. तीर्थक्षेत्री भेट देण्याचा विचार कराल. भाग्याची उत्तम साथ आहे. मानसन्मानाची प्राप्ती होईल.

उपाय देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

मिथुन

तब्येतीला  जपावे लागेल. सर सलामत तो पगडी पचास  याचा अनुभव येईल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील पण पैशाकरता कष्ट जास्त करायची गरज आहे. प्रवास घडेल. त्यातून फायदा होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीमधून लाभ संभवतो. नोकरदारवर्गाला समाधानकारक काळ आहे. जोडीदाराबरोबर मात्र खटके उडण्याची शक्मयता आहे. समाजात नाव होईल. भाग्य उजळेल .

उपाय हिरवे मूग मंदिरात दान द्यावे.

कर्क

भाग्याची साथ आहे. प्रति÷sतदेखील वाढ होईल पण तब्येतीला जपा. छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. नोकरदारवर्गाला वरि÷ांकडून त्रास संभवतो त्यामुळे कामात चूक होऊ देऊ नका. पैशाचे नियोजन योग्य रीतीने करावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमींना उत्तम काळ आहे.

उपाय सफाई कर्मीना तळलेला गोड पदार्थ द्यावा.

सिंह

तुमच्या जवळचीच माणसे किंवा तुमच्यासोबत काम करणारी माणसे यांच्या सहाय्याने अवघड काम पूर्ण होईल. तब्येतीचा पाया मजबूत राहील. पैशांच्या वसुली करता मात्र जास्त प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीचे वाद सुटतील. धोकादायक गुंतवणूक टाळलेली बरी. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. गुप्त बातमी समजेल. मानसन्मान वाढेल.

उपाय सूर्याला अर्ध्य द्यावे.

कन्या

तुम्ही योजलेला कामांमध्ये थोडे अडथळे येण्याची शक्मयता आहे पण निराश होण्याची गरज नाही. सामान्य सर्दी पडशासारखा विकार त्रास देईल. पैशांचे आगमन चांगले असेल. लहान बंधू भगिनींचे सहकार्य लाभेल. तुमच्या लिखाणाचे कौतुक होईल. मातृचिंतेचा काळ आहे. प्रेमींना उत्तम काळ आहे.  गुंतवणूकीतून लाभ संभवतात. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. वाहन चालवताना सावध रहावे.

उपाय मंगळवारी गणपतीचे दर्शन घ्यावे.

तूळ

 काही रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मागील काही दिवसात झालेल्या तब्येतीच्या त्रासातून  सुटका मिळेल. मनाप्रमाणे कामे पूर्ण होऊन पैसे मिळतील. प्रवास कोणत्याही परिस्थितीत टाळावा. कागदपत्रांवर सही करताना सावध राहावे. वाहन सुख उत्तम असेल. नोकरदारवर्गाला चांगले दिवस आहेत. वैवाहिक जीवनात अपेक्षापूर्ती होईल. लाभ चांगले मिळतील.

उपाय देवीला कुंकूमार्चन करावे.

वृश्चिक

तब्येतीच्या त्रासातून सुटका मिळाल्याने आनंदी असाल. मनाप्रमाणे पैसे न मिळाल्याने मन खट्टू होईल. कुटुंबात विसंवाद संभवतो. प्रवासाचा योग आहे. जमिनीचे प्रश्न मार्गी लागतील. मुलांची प्रगती होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. प्रेमींना अनुकूल काळ आहे. नोकरदारवर्गाला प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव असेल.

उपाय मंगळवारी बारा वाजता मारुतीचे दर्शन घ्यावे.

धनु

पोटाच्या तक्रारी किंवा व्हायरल ताप येऊ शकतो, सावध रहावे, निष्काळजीपणा करू नये. पैशांच्या बाबतीत नवीन सोर्स मिळू शकतात. कुटुंबातील वातावरणात गोडवा राहील. एकमेकांना सहाय्य कराल. प्रवासातून फायदा संभवतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत नशीबवान असाल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. शेअर सारख्या गुंतवणुकीतून फायदा  होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सावध रहावे.

उपाय जोड केळीचे दान मंदिरात करावे.

मकर

तब्येतीची आणि पैशांची काळजी मिटेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण कराल. शेजारी किंवा लहान बहीण भाऊ यांच्याशी सुसंवाद घडेल. जमीनजुमल्याचे प्रश्न सुटतील. कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहावे. प्रेमींना प्रतिकूल काळ आहे. नोकरदारवर्गाला त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात बाचाबाची होईल.

उपाय आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ घालावे.

कुंभ

आत्मविश्वास आणि कर्तबगारी वाढेल. तब्येत उत्तम असेल. अनपेक्षितरित्या धन आगमन होईल. जुनी येणी वसूल होतील. प्रवास सांभाळून करावा. जमिनीचे व्यवहार सध्या टाळावेत. आईबद्दल काळजी वाटेल. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा येण्याची शक्मयता आहे. प्रतिस्पर्धी डोईजड होऊ शकतात. नोकरदार वर्गाला कट-कारस्थान यापासून सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक सुख उत्तम असेल.

उपाय सायंकाळी लोबान धूप जाळावा.

मीन

व्यावसायिकांना आणि खासकरून नोकरदारवर्गाला उत्तम कालावधी आहे. संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा. पैशांच्या बाबतात भाग्यवान असाल. कागदोपत्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. संतान पक्षापासून थोडा त्रास संभवतो. नोकरदारवर्गाला सुवार्ता मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी भांडण संभवते. वाहन चालवताना अत्यंत सावध रहावे. गुप्त बातमी कळेल. बऱयाच ठिकाणी भाग्य साथ देईल.

उपाय मध्यान काळी दत्तप्रभूचे दर्शन घ्यावे.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 27 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य 3-6-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 25 मार्च 2023

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जानेवारी 2022

Patil_p

राशीभविष्य

Patil_p