17-4 ते 23-4-2022
मेष
तुम्ही असे काही काम बाजूला ठेवले असेल की जे नंतर केले तरी चालेल तर त्या कामावर तुम्ही आता आपले लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे काही नवीन यश संपादन करू शकाल. काही बदल संभवतात. नवीन घर किंवा करियरसंबंधात प्रगती होऊ शकते. चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग करून घ्यावा. पाच हळकुंड जवळ ठेवावे.
वृषभ
सध्याचा काळ तुम्ही समाधानाचे काही क्षण अनुभवत आहात. या आठवडय़ात आनंदाचे क्षण येतील. नातेसंबंध दृढ होतील. एखाद्या हुशार, प्रेमळ आणि बुद्धिमान स्त्रीमुळे फायदा होऊ शकतो. करियरमध्ये भरभराट होऊ शकते. तुमच्या कल्पनाशक्तीमुळे अवघड कामे सोपी होतील. या आठवडय़ात तुमच्या मनात चांगले भाव निर्माण होतील. गरजूला आर्थिक मदत करावी.
मिथुन
सध्याचा काळ हा तुम्ही विवंचनेमध्ये किंवा चिंतेमध्ये घालवत आहात. आर्थिक नियोजन नीट होईल ना याची काळजी तुम्हाला वाटू शकते. पैसा जरी आला तरीही चिंता सुटत नाही आणि गुंतवलेल्या पैशापासून फायदा मिळेल का याचाच विचार जास्त होतो आहे. एकूण काहीतरी मिळण्यामागे काहीतरी गमावणे आहे याची तुम्हाला जाणीव होत आहे. पैशाच्याबाबतीत निष्काळजीपणा नडू शकतो. संध्याकाळच्या वेळेला घरी कापूर जाळावा.
कर्क
जे काम हातात घ्याल ते पूर्ण करण्याकरता योग्य माणसांची निवड करणे गरजेचे ठरेल. या आठवडय़ात तशी माणसे तुम्हाला भेटतील. पैशांच्याबाबतीत सुसंधी प्राप्त होतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांच्या फसवणुकीला बळी पडू नये. आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे. मुंग्यांना साखर घालावी.
सिंह
तुमच्या हट्टामुळे किंवा आपल्या मतावर ठाम राहण्यामुळे कामाच्या ठिकाणी एखादा वाद उद्भवू शकतो. कठोर बोलण्यामुळे परिवारातील एखाद्या सदस्याचे मन दुखावले जाऊ शकते. आपल्या वागण्या बोलण्यावर संयम ठेवणे हे या आठवडय़ात गरजेचे आहे. केवळ पैशांचा विचार न केलेला बरा. कामाच्या ठिकाणी हार्मोनी कशी निर्माण होईल हे पाहणे जास्त गरजेचे आहे. गरजूला गूळ दान करावा.
कन्या
सध्याच्या वातावरणामध्ये तुमच्या पाठीमागे बोलणारे लोक जास्त झाले आहेत. हितशत्रू किंवा गुप्तशत्रू तुमच्या विरुद्ध ज्या कारवाया करत आहेत त्यांना आवरणे गरजेचे आहे. आणि अशा वेळेला कठोर भूमिका घेणे तुम्हाला भाग पडेल. आपले कोण आणि परके कोण याची समज देणारा हा आठवडा असेल. संपूर्ण विश्वास ठेवावा असा काळ नाही हा टॅरोचा संदेश आहे. धार्मिक स्थळाजवळील झाडाला पाणी घालावे.
तूळ
काही कारणामुळे सध्या तुमची मनस्थिती बिघडू शकते. कोणत्यातरी बाबतीमधील कमतरता किंवा अभाव तुम्हाला सतावू शकतो. ही कमतरता केवळ पैशांच्या बाबतीमध्ये असेल असे नाही. नातेसंबंधातसुद्धा एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवू शकतो. वैवाहिक जोडीदाराला परिस्थितीचे चटके जास्त बसू शकतात. या आठवडय़ात अनेक कामे एका वेळेला करावी लागतील आणि कोणाकडून कुठले काम करून घ्यावे हे तुम्ही योग्य रीतीने जाणू शकाल. कुत्र्यांना बिस्किट घालावे.
वृश्चिक
प्रवासाचा थकवा जाणवेल. कामाचा उरक कमी होईल. कामाच्या ठिकाणी व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. काही माणसांनी वचन न पाळल्यामुळे मनस्ताप होऊ शकेल. तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे असेल. डोक्मयाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. गुंतवणुकीचा फायदा होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. कष्टकऱयांना पाणी पाजावे.
धनु
जो वेळ तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग करा. तुमच्या अंतःकरणातील आवाजाकडे लक्ष द्या. हा आवाज आपण दडपून टाकला असेल तर लक्षात येण्यासाठी थोडा वेळ जाईल. आपल्या अडचणीच्या वेळी हा आवाज आपल्याला खूप मदत करतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या शक्तीचा फायदा घ्या. या आठवडय़ात तुमच्या ज्ञानात, विद्वत्तेचा वाढ होईल आणि हे ज्ञान भविष्याकरता फायदेशीर ठरेल. अंध व्यक्तींना आर्थिक मदत करावी.
मकर
सध्याच्या तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये काहीतरी बदल करावा लागेल किंवा एखादी गोष्ट तात्पुरती थांबवावी लागेल. ज्यामुळे भविष्यात किंवा पुढील काळात खात्रीशीररित्या फायदा होईल. या आठवडय़ात काहीतरी छोटा-मोठा तोटा किंवा नुकसान होऊ शकते. कामानिमित्त जवळच्या व्यक्तींपासून दूर जावे लागू शकते. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे क्लेश होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. गरजूना औषधांचे दान करावे.
कुंभ
या आठवडय़ामध्ये नकारात्मक विचारांवर विजय मिळवून सकारात्मक विचारांवरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. कारण नुसत्या नकारात्मक विचारांमुळेसुद्धा आपली चांगली शक्ती खूप खर्च होते. दिवास्वप्न बघणे किंवा कल्पना रंगवणे सोडून व्यावहारिक होण्याची गरज आहे. संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे त्याचा फायदा उठवावा. मजुरांना ताक वाटावे.
मीन
परिवारातील मतभेदांमुळे किंवा सततच्या छोटय़ा-मोठय़ा कटकटीमुळे मन उदास राहण्याची शक्मयता आहे. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांवर पूर्ण अवलंबून राहणे टाळावे. ऐकलेली बातमी खरी असेल अशा भ्रमात राहू नये. एखाद्या गोष्टीचा संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. या आठवडय़ात सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. तुमच्या मनातील योजना उघड करू नयेत. अशोकाचे पान जवळ ठेवावे.
टॅरो उपाय ः घर बांधताना किंवा घर बांधून झाल्यावरसुद्धा जर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱयाखाली काचेच्या बाटलीमध्ये पारा भरून आठ इंच खाली पुरली तर घरात वाईट शक्ती शिरू शकत नाहीत.