Tarun Bharat

झोमॅटो कर्मचाऱयांना देणार 1-1 रुपयांमध्ये समभाग

4.66 कोटी समभागांचे होणार वितरण ः कंपनीचे समभाग पुन्हा तेजीत

नवी दिल्ली

 फूड डिलिवरी करणारी कंपनी झोमॅटो या कंपनीच्या समभागातील घसरणीचे सत्र सुरु असतानाच याच दरम्यान झोमॅटोने आपल्या कर्मचाऱयांना 1-1 रुपयांमध्ये 4.66 कोटी रुपयांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे समभाग (एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन प्लॅन) यांच्या अंतर्गत देणार असल्याची माहिती कंपनीने 26 जुलैला दिली आहे.

यावेळी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळाच्या नॉमिनेशन ऍण्ड रेमुनरेशन समितीने 4,65,51,600 इक्विटी समभागांना स्टॉक ऑप्शनच्या आधारे कर्मचाऱयांना देण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

बुधवारी शेअर बाजारात झोमॅटोचे समभाग तेजीत राहिले होते, यामध्ये दुपारी 12.40 वाजता समभाग 3.48 टक्क्यांच्या तेजीसह 43.10 रुपयावर ट्रेड करत होते.

Related Stories

रिलायन्सची ऑईल-केमिकल व्यवसायासाठी स्वतंत्र योजना

Patil_p

हॉटेल, टुरिझम क्षेत्र येतंय पूर्वपदावर

Patil_p

स्पेन्सर्स रिटेलची सुरु होणार स्टोअर्स

Patil_p

कोरोनामुळे अ‍ॅमेझॉनला 7500 कोटींचा तोटा

datta jadhav

ई-कॉमर्स बाजाराला उज्ज्वल भविष्य

Patil_p

एमआरएफच्या नफ्यात 53 टक्के घट

Patil_p