मुंबई
फूड डिलीव्हरी क्षेत्रात कार्यरत फर्म झोमॅटोचे समभाग बुधवारी शेअर बाजारात 4 टक्के इतके वाढलेले दिसले. विलीनीकरणासंदर्भात झोमॅटोची 24 जूनला बैठक होत असून त्यात याबाबतचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. झोमॅटोचा समभाग बुधवारी बीएसईवर 3.7 टक्के वाढत 68 रुपयांवर पोहचला होता. 2022 मध्ये सदरच्या कंपनीचा समभाग जवळपास 51 टक्के इतका खाली आला आहे.