Tarun Bharat

झुकेरबर्ग यांची संपत्ती 5.66 लाख कोटी रुपयांनी घटली

Advertisements

ब्लूमबर्ग यादीत मार्क 20 क्रमांकावर घसरले ः मेटामध्ये प्रवेश पडले महाग

नवी दिल्ली

 जगातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी फेसबुकचे (आता मेटा) संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना मेटाव्हर्सच्या जगात पाऊल ठेवणं महागात पडलं असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक मोठय़ा टेक कंपनीसाठी हे एक कठीण वर्ष ठरत आहे. याच दरम्यान मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती जवळपास निम्म्यावर घसरली आहे. 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती या वर्षात 71 अब्ज डॉलर्स म्हणजेच 5.66 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. जागतिक अब्जाधीशांच्या यादीत यावर्षी झुकरबर्ग यांच्याच संपत्तीत सर्वाधिक घसरण झाली असल्याची माहिती आहे. 

अब्जाधीशाच्या यादीत  20 व्या क्रमांकावर

मार्क झुकरबर्ग 55.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.45 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आले आहेत. 2014 पासून झुकेरबर्गचे हे सर्वात खालचे स्थान आहे आणि ते वॉल्टन कुटुंबातील 3 सदस्य आणि कोच कुटुंबातील 2 सदस्यांच्या मागेही पडले आहेत.

8.45 लाख कोटी रु. 2 वर्षांपूर्वी झुकेरबर्गची संपत्ती

2 वर्षांपूर्वी 38 वर्षीय मार्क झुकरबर्गची संपत्ती 106 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8.45 लाख कोटी रुपये होती. त्यानंतर जागतिक अब्जाधीशांच्या यादीत झुकेरबर्ग यांच्या पुढे फक्त जेफ बेझोस आणि बिल गेट्स होते.

मेटाची बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी धडपड

सप्टेंबर 2021 मध्ये झुकरबर्गने मेटा लाँच केले आणि फेसबुक इंकचे नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म असे ठेवले. यानंतर कंपनीचा खऱया अर्थाने वाईट टप्पा सुरू झाला आणि तेव्हापासून बाजारात कंपनीची खराब कामगिरी सातत्याने सुरू असल्यानेच याचा फटका त्यांना बसला आहे.  सध्या ही कंपनी जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते आहे.

Related Stories

स्टील कंपन्यांच्या समभागात पडझड

Patil_p

कोरोनाचा इंडिगोला बसला फटका

Patil_p

‘एसबीआय’ची आरोग्यम हेल्थकेअर योजना सादर

Amit Kulkarni

गुगल-फोर्ड यांच्यात भागीदारी

Patil_p

सलग चौथ्या महिन्यात सेवा क्षेत्रात तेजीचे वारे

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार दमदार तेजीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!