सातारा
कोरेगाव तालुक्यातील तडवळे ते पिपोडे रस्त्यावर पिपोडे बु ता.कोरेगाव गावच्या हद्दीत रस्तागस्त वनविभागाचे फिरते सातारा पथक घालत होते.दि. 04रोजी या पथकास पिपोडे येथे ट्रक्टर् व ट्राली श्प्11R 9975 मधून राजेंद्र संपतराव भोईटे (रा.पिपोडे बु ता.कोरेगाव) हे मिश्र प्रजातीचा लाकूडमाल विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी वाहनासह लाकुड असा अंदाजे 4.50 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियम,1927 चे कलम 41 2(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई वन परीक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी वनपाल गजानन भोसले, वनरक्षक- दीपक गायकवाड़, विजय भोसले, यांच्या सोबतीने पार पाडली.