ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई तब्बल 12 किलो सोने जप्त केले आहे. (12 Kg Gold Seized on Mumbai Airport) कमरेला लावायच्या बेल्टमधून एक प्रवाशी सोन्याची तस्करी करत होता. तर इतर पाच जण त्याला मदत करत होते. सीमाशुल्क विभागाने या सहा जणांना अटक केली आहे.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सुदानच्या एका नागरिकाची हालचाल संशयास्पद आढळली. त्यानंतर त्याची झडती घेतली असता कमरेला लावलेल्या विशेष बेल्टमध्ये तब्बल 12 किलो सोने आढळून आले. हे सोने परदेशात नेण्याच्या तयारीत हा सुदानी नागरिक होता. त्याला इतर पाच प्रवाशी मदत करत होते. आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यासाठी या पाच प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. आरोपीसह सहा जणांना सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सहा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : आता देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट; नीतेश राणेंकडून उपमुख्यमंत्र्यांना पदवी बहाल
अटक करण्यात आलेले सोने तस्कर मुंबईत कोणाच्या संपर्कात होते, तसेच सुदानमधून सोने तस्करी कधी आणि कशी होते, याबाबतचा तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.