Tarun Bharat

देशात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येणार आहेत. तसेच आज मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. भारताच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबरला वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच 70 त्या राजसत्तेवर होत्या.

राणी एलिझाबेथ यांना वयोमानानुसार आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. त्यांची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे काही काळापासून त्या बकिंगहॅम पॅलेस सोडून स्कॉटिश राजवाड्यात वास्तव्यास होत्या. नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे राणी एका बैठकीत त्यांच्या राजकीय सल्लागारांना भेटणार होत्या. परंतु डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने बैठक रद्द करण्यात आली होती. बकिंगहॅम पॅलेसमधील गार्ड चेंजिंग सिरेमनीही रद्द करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अधिक वाचा : आता देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट; नीतेश राणेंकडून उपमुख्यमंत्र्यांना पदवी बहाल

16 देशांच्या महाराणी

एलिझाबेथ या केवळ ब्रिटनच्याच नव्हे तर ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ऍटिगा, बार्बुडा, सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.

Related Stories

भारताला ‘वांशिक शुद्धता’ नको, तर नोकरीची सुरक्षा आणि…; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Archana Banage

कर्नाटकात ऑनलाईन बेटिंग आणि जुगारावर बंदी; विधानसभेत विधेयक मंजूर

Archana Banage

नवरात्रोत्सवाला आजपासून प्ररंभ

Archana Banage

एका उंदरासाठी…

Patil_p

कोरोनाला रोखण्यासाठी ‘अश्वगंधा’ प्रभावी

Patil_p

देशात रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचा परतावा : निर्मला सीतारामन

Tousif Mujawar