Tarun Bharat

बाळासाहेब असते तर,एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता; अभिजीत बिचकुले

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेच्या भुमिकेनंतर राज्यात शिवसैनिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान बिगबाॅस फेम अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichukale)यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत ते योग्य नाही. आता जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)असते तर त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) कानाखाली जाळ काढला असता अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचकुले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज ते आळंदीला गेले आहेत.

हेही वाचा-एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; म्हणाले, सत्तेसाठी प्रतारण केली नाही…

पुढे बोलताना ते म्हणाले, मी अपक्ष आहे. माझा शिवसेनेचा काही संबंध नाही. पण सध्या जे राजकारण सुरु आहे त्यावरुन सर्वसामान्यांची होरपळ होतेय असे वाटते असेही ते म्हणाले. आज जे सेनेतील मोठे नेते आहेत ते बाळासाहेबांच्यामुळेच मोठे झाले आहेत. यांना अभिजीत बिचुकले वरईमध्ये येवून उभा राहतो याची काॅपी करायची सवय लागली आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर राजकारण सुरु आहे असं मला वाटतं पण तो त्यांच्या घरचा मुद्दा आहे याबाबतीत बोलण योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले.

हेही वाचा- भाजप सोबत जावूया! थेट मुख्यमंत्र्यांजवळ उर्वरीत आमदारांची ‘मन की बात’


सध्या काही आमदार नाॅटरिचेबल आहेत यासंदर्भात बोलताना बिचुकले म्हणाले, नेमका आमदारांचा आकडा किती आहेत हे मला माहित नाही. परंतु तरुण आमदार सेनेयातून बाहेर पडतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री तुम्ही रहा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. मी श्राहरी विष्णूचा प्रचंड मोठा भक्त आहे. शेकडो वर्षाचा परंपरा असल्याने आज कंदी पेडे आणि हार घेऊन आलो आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

महिला दिन : राज ठाकरेंनी महिलांना दिला ‘हा’ संदेश

Tousif Mujawar

मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा; शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत

Archana Banage

कोरोना लसीचा जगातील पहिला डोस भारतीय वंशाच्या व्यक्तीला

datta jadhav

चिंताजनक : भारतात मागील 24 तासात 52,123 नवे कोरोना रुग्ण; 775 मृत्यू

Tousif Mujawar

राजस्थानमध्ये 772 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

‘राज’भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले…

Tousif Mujawar