पुणे / प्रतिनिधी :
Actor Milind Soman’s ‘Green Ride’ for Environment पर्यावरण रक्षण व निरोगी जीवनशैलीसाठी भारताचा सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण याने पुन्हा एकदा ‘ग्रीन राइड’ सुरू केली असून, यावेळी तो मुंबई ते मंगळूर हा प्रवास सायकलवरुन करणार आहे. 26 डिसेंबरपर्यंत विविध शहरांतून तो ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या मोहिमेची ही दुसरी आवृत्ती आहे.
लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या ग्राहकांसाठी टिकावू वस्तू बनविणाऱ्या कंपनीने ‘ग्रीन राइड’ उपक्रम सुरू केला आहे. मिलिंद सोमण मुंबई ते मंगळूर अशी ग्रीन राईड एकटय़ाने सायकल चालवत 8 दिवसांत 10 शहरांमधून 1400 किमी अंतर पूर्ण करणार आहे. मुंबई, कराड, कोल्हापूर, बेळगाव, शेगाव, हिरेबेन्नूर, तुमकुरू, म्हैसूर, मंगळूर असा हा प्रवास असणार आहे.
अधिक वाचा : अखेर 14 वर्षांचा प्रश्न मार्गी; पिंपरी-चिंचवडकरांची शास्ती करातून मुक्ती