Tarun Bharat

अनिल देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज CBI च्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामळे देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अटकेच्या पाच महिन्यानंतरही देशमुखांना जामीन मिळू शकला नाही, हीदेशमुखांसाठी चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचेही डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, देशमुखांनी हे आरोप फेटाळले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडीकडूनही सुरू आहे. सीबीआयनेही देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. एप्रिलमध्ये सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख, पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : भीमाशंकरजवळील पोखरी घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

Related Stories

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला उद्धव ठाकरेंचं उत्तर

Archana Banage

Tokyo Olympics 2020: बॉक्सर पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, दीपिका कुमारीही विजयी

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

Archana Banage

जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

Tousif Mujawar

‘एनडीए’तही आता ‘महिला’राज

Patil_p

साताऱयात जुगार खेळणाऱया आठजणांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!