Tarun Bharat

संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा ; आशिष शेलारांचा सल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातचं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्रिमंड बैठकिवरुन एक ट्विट करत हे काय सुरू आहे ? असा राज्यपालांना सवाल केला आहे. तसेच गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही असा दावाही केला आहे. याला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी उत्तर दिले आहे. तसेच घरी जाऊन राऊतांनी गजनी सिनेमा बघावा असा खोचक सल्लाही दिला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार
आशिष शेलार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी ३२ दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं, याचा अर्थ त्यांचे सरकारही अनाधिकृत होतं का? असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांनी घरी गेल्यावर गजनी सिनेमा नक्की बघावा. ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी हा सिनेमा बघावा, असा सल्लाही दिला.

हेही वाचा- राष्ट्रपती निवडणूकीसाठी शिंदेंची काॅंग्रेसवर नजर; २०० आमदार मतदान करण्याचा निर्धार

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांची मागणी
भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ १ए नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते. तसेच राज्यात नेमक काय चाललं आहे? असा प्रश्नही त्यांनी राज्यपालांना विचारला. एवढचं नाही तर आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Related Stories

सातारा : वाठार स्टेशनमध्ये अवतरलं काश्मीर

datta jadhav

बेताल वक्तव्य बंडातात्यांना भोवलं

Patil_p

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार

Rohan_P

वाडियातील रुग्णसेवा पूर्ववत

amol_m

वेश्या व्यवसाय कायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Abhijeet Shinde

बडय़ा धेंढय़ांना पालिकेचे अभय

Patil_p
error: Content is protected !!