Tarun Bharat

गोव्यात काँग्रेसला खिंडार; ११ पैकी ८ आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू यांचे स्पष्टीकरण

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गोव्यात काँग्रेसला (Goa Congress) मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ११ पैकी ८ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat), विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) आणि इतर काँग्रेस आमदार लवकरच भाजपवासी होणार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. “आम्ही भाजपमध्ये कधीही सामील होऊ शकतो आणि आम्ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कॉलची वाट पाहत आहोत,” असे एका काँग्रेस आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, या अफवा असून आमचा कोणताही आमदार भाजपाच्या वाटेवर नसल्याचे गोवा काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

काँग्रेसच्या 8 आमदारांनी गोव्यात बंड केले आहे. कळंगुटचे मायकल लोबो, शिवोलीचे डिलायला लोबो, कुंभारजुवेचे राजेश फळदेसाय, साळगावचे केदार नाईक, मुरगांवचे संकल्प आमोणकार, नुवेंचे आलेक्स सिकेरा, मडगावचे दिगंबर कामत, कुंकळीचे युरी आलेमाव हे आठ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यांनतर गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे या आमदारांची समजूत काढत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या सगळ्या अफवा असून येत्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

मायकल लोबो अगोदर भाजपामध्ये होते. मात्र, निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण लोबो यांच्या पुन्हा पक्षांतक करण्याच्या चर्चा अफवा असल्याचे काँग्रेस गोवा अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आमदारांमध्ये एकी असून या सगळ्या अफवा असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलै 2019 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत ‘बाबू’ कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या नऊ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. खरे तर 2022 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या आमदारांना चर्च आणि मंदिरासमोर शपथ दिली होती की ते निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नाहीत आणि भाजपमध्ये जाणार नाहीत. राजकीय निरीक्षकांनी सांगितले की, काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने गोव्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार भाजपकडे वळण्याची ही दुसरी वेळ आहे.

Related Stories

पर्ये येथे उद्धवबुवा जावडेकर यांचे कीर्तन

Amit Kulkarni

‘त्या’ दहा आमदारांना अपात्र ठरवावे

Amit Kulkarni

श्रावणमासानिमित होंडा आजोबा कळसापेड देवस्थानात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Amit Kulkarni

भारताच्या चुकीच्या नकाशावरून वाद; ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात गुन्हा

Archana Banage

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Archana Banage

एमव्हीआर कंपनी विरोधात पेडणेत तीव्र संताप

Omkar B