Tarun Bharat

औरंगाबादेत जुगार अड्डयावर मोठी कारवाई, 5 महागड्या कारसह 1.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

औरंगाबादमध्ये एका VIP जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी पाच महागड्या कारसह 1.75 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार खेळणाऱ्या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत एका खाजगी फार्म हाऊसवर जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी जिल्ह्यातील बिल्डर आणि प्रतिष्ठित व्यक्ती जुगार खेळाताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून 25 लाखांची रोकड आणि 5 महागड्या चारचाकी गाडय़ांसह या लोकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकून 1.82 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक वाचा : फडणवीस-पटोले यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण

औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखा आणि शिल्लेगाव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे औरंगाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Stories

घरगुती गणपतीच्या मूर्ती खरेदीला थंड प्रतिसाद

Patil_p

MIM च्या सभेनंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

Archana Banage

करवीरमधून पहिला अर्ज दाखल; सांगवडे ग्रामपंचायतीचा पहिला अर्ज

Archana Banage

गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली जाहीर

Tousif Mujawar

एकविरा देवीची यात्रा रद्द

tarunbharat

आरोग्य विभागाचे कारभारी बदलणार

Patil_p
error: Content is protected !!