Bison In Kolhapur : गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरात ठाण मांडलेला गवा अखेर वन विभागाच्या निदर्शनास आला. रमणपणा परिसरात ऊसतोड कामगारांना निदर्शनास आल्यानंतर गवारेड्याने उसात शिरकाव केला होता. अखेर वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून गाव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून पाच सहा गाव्यांचा कळपच कोल्हापुरात असल्याचं समोर आले आहे. रमणमळा परिसरातील उसाच्या शेतवळीत गवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही बाजूला गस्त ठेवली असून अग्निशमन दलाचे पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्राने केलं धाडस, पण बससेवा पुन्हा बंद
रमणमळा परिसरातील शेतवडीत सहा नव्या रेड्यांचा कळप असल्याचे सिद्ध होताच.खबरदारी म्हणून वन विभागाची तीन पथके, अग्निशामन दल आणि एक पोलीस पथक बोलवण्यात आले आहे.


previous post