लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली गावाच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तळेगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण जखमी आहेत.
दीपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राहुल कैलास जाधव (वय 28, संत तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापु पवार (वय 51, रा. खंडोबा माळ पिंपरी) आणि रोहन भगवान वाघमारे (वय 28, पिंपरी) हे जखमी झाले आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांकडे 6 बंगले कसे?; सोमय्याजी यावरही बोला…
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्वजण मोटार कार क्र. MH 14 JX 9385 मधून तळेगावच्या दिशेने जात असताना तुंगार्ली गावाच्या हद्दीत समोरुन जाणाऱ्या कंटेनरला कारने मागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. यात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.