ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षांमुळे 27 फेब्रुवारीऐवजी आता 26 फेब्रुवारीला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजप आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 7 फेब्रुवारीपर्यंत आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होईल. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 26 फेब्रुवारीला मतदान होईल. 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.
अधिक वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील चार नृत्य समुहांचा सहभाग
या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसपक्षाने कंबर कसली असून, जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूकही बिनविरोध व्हावी असे त्यांनी म्हटले आहे.