Tarun Bharat

खंडाळा घाटात केमीकल टेम्पो जळून खाक

Advertisements

लोणावळा / वार्ताहर :

भिवंडी येथून हैदराबादच्या दिशेने केमीकल ड्रम घेऊन जाणारा टेम्पो खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर 42 च्या दरम्यान जळून खाक झाला. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर मॅजिक पॉईंटजवळ गाडीतील एक ड्रमला अचानक आग लागली. चालकाला आपल्या वाहनातल्या ड्रमला आग लागल्याचे समजतात चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने जागीच गाडी थांबवून गाडी बाहेर उडी घेतली. क्षणभरात आगीने एवढा मोठा पेट घेतला की, ते वाहन कोणते आहे, याचा अंदाजही येत नव्हता. आगीच्या ज्वाळा आजूबाजूला पसरल्या. त्यामुळे बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेचे पोलीस उप निरीक्षक अनिल शिंदे यांनी दोन्हीकडची वाहतूक थांबवली. घटनास्थळावरची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडच्या यंत्रणेने आग विझविण्याचे प्रयत्न केले. पाठोपाठ देवदूत यंत्रणा, एमआयडीसी पातळगंगा, उत्तम कंपनी, टाटा स्टील, एचपीसीएल कंपनीच्या फायर ब्रिगेडच्या युनिट त्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाल्या.

अधिक वाचा : राजकारण्यांची बौद्धिक पातळी घसरलेली; विश्वास पाटील यांची टीका

जवळपास दोन तासाच्या संयुक्त प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड इत्यादी यंत्रणांनी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान दोन्ही बाजूच्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, ती पूर्ववत करण्यासाठी देखील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा आणि खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी योग्य हाताळणी केली.

Related Stories

‘केंद्राने देवेंद्र फडणवीसांचा शंकरराव चव्हाण केला’; प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्वीट

Archana Banage

प्रकल्पविरोधी राजकारण करणारे तेच, सीतारामन यांचा सेनेवर पलटवार

datta jadhav

पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी अतिरिक्त विभागीय आयुक्तांवर

Archana Banage

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला उद्धव ठाकरेंचं उत्तर

Archana Banage

कव्वालीच्या कार्यक्रमात खा. इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

datta jadhav

काँग्रेसला अर्धवेळ नाही, पूर्णवेळ अध्यक्ष हवा – पृथ्वीराज चव्हाण

Archana Banage
error: Content is protected !!